नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
महेश दारुंटे
दि.१६.०३.२०२०
येवला- खिर्डीसाठे येथे असलेल्या पाझर तलावातील पाण्याचा उपसा शेजारील परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे मत्सयव्यवसाय धोक्यात आला आहे. आदिवासींचा मत्स्व्यवसाय सुरू रहावा यासाठी पाण्याचा उपसा थांबविण्याची मागणी येथील मत्स्व्यवसायीकांनी केली आहे. या मागणीसाठी आदिवासी बांधव बुधवारी (दि. १८) येवला तहसील कार्यालय येथे बेमुदत उपोषणाला बसणार आहे.
या संदर्भात पाटबंधारे विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील खिर्डीसाठे येथे असलेल्या पाझर तलाव येथील आदिवासी बांधवातर्फे मत्स्व्यवसाय करण्यात येतो. यासाठी एकलव्य मच्छिमार संस्था स्थापन केली असून आदिवासी बांधवांना रोजगार मिळवा, त्यांचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी या तलावात अधिकृतरित्या मत्स्व्यवसाय करण्यात येतो आहे. परंतु, या तलावातून काही शेतकरी पाणि उपसा करत आहे. त्यामुळे या तलावात सोडलेले मत्स्यबीज मात्र पाण्याच्या अतिरिक्त उपशामुळे तलावातील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने मत्स्व्यवसाय धोक्यात आला आहे. सतत होत असलेल्या पाणी उपशामुळे तलावातील मासे पाण्याअभावी मरण पावतील. याचाच परिणाम म्हणून चार ते पाच लाख रुपयांची आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. तलावातील पाणी उपसा लवकरात लवकर थांबवावा यासह इतर मागण्यासाठी बुधवारी (दि.१८) एकलव्य संघटनेचे प्रदेशध्यक्ष तसेच म्हाडा महामंडळाचे अध्यक्ष शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वा खाली बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर विजयलाल माळी, विनोद मोरे, संजय माळी, जालिंदर मोरे, संतोष माळी, मच्छिंद्र मोरे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.



















