सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी, धीरज जगताप
दि.२०.३.२०२०
फलटण- तालुक्यातील साखरवाडीतील सर्व दुकाने बंद करून एक आगळा वेगळा आदर्श घडविला शुक्रवार दुपारी पाच वाजता सर्व दुकाने बंद करून पोलीस प्रशासनाला तसेच जिल्हा प्रशासनाला योग्य ती मदत साखरवाडी ग्रामस्थांकडून केली जाईल. पुढील शासकीय सूचना मिळेपर्यंत साखरवाडी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती साखरवाडी व्यापारी असोसिएशन यांच्याकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली केली आहे. भारत देशात कोरूनाच्या जीवघेण्या संकटातून बाहेर पडण्यासाठी साखरवाडी येथे पदाधिकाऱ्यांची बैठक आणि व्यापारी संघटनेकडून बंद पाळण्यात आला यावेळी रविवार आठवडा बाजार बंद ठेवण्याच्या ठोस निर्णय घेण्यात आला या कार्यक्रमास पासून बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे या निर्णयाला सर्वांनी एकमताने मंजुरी दिली देशामध्ये समाजाच्या हितासाठी निर्णय घेण्यात आला आहे तसेच हा निर्णय सर्व बांधवांना सुरक्षितेसाठी घेतलेला आहे तसेच साखरवाडी तील सर्व बांधवांनी या निर्णयाचे कोरूना च्या संकटातून बाहेर पडण्यास सर्वांनी मदत करणे काळाची गरज आहे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले.



















