सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी सुभाष जाधव
दि.२२.०३.२०२०
फलटण- आज मध्यरात्रीपासून संपूर्ण महाराष्ट्रात धारा १४४ लागू करण्यात येत आहे पाच पेक्षा अधिक लोक एकत्र जमू नये. कोरोना रुग्ण हे गुणकारा सारखे वाढत असल्याने नाईलाजास्तव हे पाऊल उचलावे लागत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकाने अन्नधान्य, भाजीपाला,मेडिकल,आवश्यक दुकाने चालू राहतील याची नोंद घ्यावी..
अन्नधान्याची साठेबाजी करू नका
कोणीही काळजी करू नये. विनाकारण घराबाहेर पडू नका विनाकारण गर्दी करू नका किव्वा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका आवश्यक असेल तरच घरातून बाहेर पडायला हरकत नाही. सर्व वाहतूक ST, रेल्वे, लोकल, एक्सप्रेस, प्यासेंजर,सेवा बंद करण्यात येत आहे तसेच अत्याआवश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांसाठी बस सेवा सुरू राहील शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्तीतीही ५ टक्के करन्यात येणार आहे. अशी माहीती राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली आहे.



















