मुंबई(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२३.०३.२०२०
मुंबई- विज ग्राहकांना या पुढे आता काही महिने घरोघरी विज बिल मिळणार नाही तर सरासरी विज बिल काढण्यात येऊन ते ऑनलाईन टाकण्यात येईल .
एस.एम.एस द्वारेही विज बिल पाठविण्यात येईल. विज बिलाचे रिडींग सद्य स्थितीत बंद करण्यात आल्याने बिलाची छपाई होणे अशक्य असल्याने ग्राहक वापरत असलेल्या सरासरी युनिटच्या आधारे बिले बनविण्यात येतील असा महत्वपूर्ण निर्णय राज्याच्या उर्जामंत्रालयाने घेतला आहे.



















