सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२३.३.२०२०
फलटण- कमिन्स कंपनीने कालच कोरोना रोखण्यासाठीच्या दिशेने योग्य पाऊल उचलत कर्मचाऱ्यांना ३१ मार्च पर्यंत सुट्टी दिल्यानंतरही शरयु कारखाना विषयी अजुन तक्रारी आल्या नाहीत, त्यांना काही वेगळं सांगण्याची गरज आहे का ? जग बोबंलतंय, देश बोंबलतोय, महाराष्ट्र बोबंलतोय. एकदा सांगितलेलं या लोकांना समजत नसेल तर कशाला हवे आहेत हे असले उद्योग फलटण तालुक्यात असल्या साक्षर लोकांपेक्षा अडाणी माणसं परवडली. इतिहास अजुनही साक्ष देतोय की निरक्षर मावळ्यांनी निष्ठेच्या बळावर इतिहास घडवला. मग आताचे साक्षर फलटणमध्ये काय कोरोनाचा इतिहास घडवण्याची स्वप्न पाहत आहेत काय? असा सवाल फलटण तालुका शिवसेने करणयात येत आहे. एकदा सांगितलेले ऐकत नसतील, कायदा मानत नसतील, माणुसकी जपत नसतील तर सील करुन टाका हे असले उद्योग फलटण तालुक्याला गरज नाही अशा उद्योगांची जे कोरोनाचा प्रादुर्भाव करुन मनुष्य जातीला संपुष्टात आणण्याचं काम करत आहेत.
शरयु, सारख्या फलटणमधील इतरही सर्वच संस्थांवरही फलटण प्रशासनाने कडक आक्रमकपणे कार्यवाही करण्याची गरज आहे. पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमु नये, जमावबंदीचा आदेश असताना हजारो लोक एकत्र आणुन या कंपन्या, कारखाने, संस्था फलटण तालुक्यातील जनतेच्या, कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळत आहेत. यांचेवर देशद्रोहाचाच खटला चालवला पाहिजे असे मत शिवसेनेचे प्रदिप झणझणे यांनी निर्भिड पत्रकार शी बोलताना व्यक्त केले.



















