नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, महेश दारूंटे
दि.२९.०३.२०२०
येवला- ग्रामपचायतींच्या माध्यमातून गावातील प्रत्येक भागात निर्जंतुकीकरणाची मोहीम हाती घतली आहे.या मोहिमेत ग्रामस्थ स्वतः त्यांना मदत करत आहेत.पुढील काही दिवस अशा उपयावर भर देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच मंगला वारुळे यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता म्हणून गावातील ग्रामस्थांना डेटॉल साबून चे वाटप करण्यात आले.तसेच प्रत्येक किराणा दुकानात बाहेर हात धुण्यासाठी पाणी ठेवण्यात आले आहे. तसेच निर्जंतुकीकरन मोहीम पुढील महिनाभर चालू राहील असल्याचे सरपंच वारुळे यांनी सांगितले.



















