नव्या वर्षात पावसासह थंडीची लाट; वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता
पुणे(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.३१.१२.२०२४
पुणे- नवीन वर्ष दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. या नव्या वर्षात पाऊस आणि थंडी नागरिकांना अनुभवावी लागणार आहे. वर्षाच्या सुरवातीला काही ठिकाणी गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात नवीन वर्षात थंडी आणि पाऊस एकाच ऋतुमध्ये नागरिकांना अभुवावा लागणार आहे. उत्तरेकडून येणारया थंड वरयामुळे राज्यात थंडी वाढली आहे. तर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पाऊस देखील पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण आहे. कोकण गोव्यात पुढील पाच ते सहा दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात आज व उद्या तर मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात देखील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, एक कमी दाबाची द्रोणिका रेषा दक्षिण पूर्व अरबी समुद्रापासून उत्तर कोकणापर्यंत स्थित आहे. त्यामुळे उत्तर कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण आहे. तर कोकण गोव्यात पुढील पाच ते सहा दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात आज व उद्या तर मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात देखील आज काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील २४ तासात किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. त्यानंतर तीन ते चार दिवस तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.