सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.१८.२.२०२०
फलटण- तालूक्यातील कापशी गांवचे हद्दीत कापशी फाटा फलटण ते सातारा जाणाऱ्या रोडवर महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर नंबर एम एच ११. २१५६ ट्रॉली मधे व स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर नंबर एम एच २६ ई ३४४८ ट्रॉलीत गौण खनिज वाळूचे उल्लंघन करून ते चोरून वाळूची वाहतूक करीत असल्याची माहिती लोणंद पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. संतोष चौधरी यांना त्याचे बातमीदाराचे मार्फत मिळाल्याने घटनेची तात्काळ दखल घेत अधिकाऱ्या मार्फत खास पथक तयार करून पोलीस उपनिरीक्षक कदम, पो.हवा. महेश सपकाळ, अविनाश शिंदे, सागर धेंडे, अमोल अडसुळ, चालक शिंदे यांना फोनवरून माहिती देऊन त्यांच्यासमवेत कापशी फाटा या ठिकाणी सापळा लावून थांबले असताना भरत जंयवत बोडरे (वय ३९) वर्ष रा. भंडलकर वस्ती लोणंद तालुका खंडाळा व संतोष महादेव भंडलकर (वय ३४) रा.सासवड तालुका फलटण ट्रॅक्टर व ट्रॉलीत एकूण ५.१५.००० रुपये किमतीचे महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर नंबर एम एच ११. २१५६ ट्रॉली तसेच स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर नंबर एम एच२६ ई ३४४८ ट्रॉली चोरून अवैधरित्या वाळूची वाहतूक करत असताना मिळून आल्याने त्यांच्यावर लोणंद पोलीस स्टेशनला वाळू चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास आदर्की पोलीस दूरक्षेत्रचे श्री.भोसले करत आहेत. वाळू माफिया भागातील ओढ्यातील अवैधपणे वाळूचा उपसा करीत असल्याचे उघडकीस येत आहे. अनेकदा शेतकऱ्यांनी वाळू चोरीबाबत तलाठी व मंडळधिकारी यांच्याकडे तक्रारी करूनही याकडे महसूल प्रशासन सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण आहे. तालुक्यासह परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु असल्याने सध्या वाळूला चढा भाव आला आहे. जिल्हा प्रशासनाने वाळूचा ठेका बंद करुन वाळू उपशावर बंदी घातली आहे. त्यामुळे वाळूमाफिया फलटण तालुक्यात विविध ठिकाणांहून अवैधपणे वाळूचा उपसा करीत आहेत. लगतच्या ओढयातून रात्रीसह दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे. वाळूचा तुटवडा असल्याने वाळू माफियाकडून शेतकऱ्यांना दमदाटी करून या ओढ्यातील वाळू नियमबाह्यपणे उपसा करून चढ्या भावाने विकली जात आहे. ओढ्याचे पात्रांमधून गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु आहे. साखरवाडी भागात रात्रंदिवस हायवा व ट्रॉलीने अवैध वाळूची वाहतूक होत आहे. वाळू उपशामुळे येथील परिसरातील रस्त्यांची व ओढयालगत असळणाऱ्या शेतीची दुरवस्था झाली आहे. याबाबत अनेकवेळा संबंधित विभागांकडे तसेच तलाठी व मंडळधिकारी यांच्याकडे तक्रार देऊनही कोणतीही कारवाई होत नाही यामुळे यांच्यात मोठ्या अर्थपूर्ण तडजोडी होत असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत महसूल, पाटबंधारे, ग्रामपंचायत प्रशासन यांनी कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी. प्रशासनाच्या या हतबलतेमुळे वाळू माफिया मात्र फोफावले असून आता याबाबत जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच लक्ष घालण्याची गरज आहे. विविध भागातील ग्रामपंचायती किंवा संबंधित शेतकरी यांच्याकडून अनेकदा संबंधित विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या असताना याकडे महसुल विभागही डोळे असुन आंधळ्याची भूमिक घेऊन बसले आहे. यामुळे वाळुमाफियांचे पैशाच्या व मनगटाच्या बळावर वर्षभरापासून पेव फुटले आहे. महसूल व पोलिस विभागकडूनच या उपशाला छुपा पाठिंबा असल्याचे बोलले जात असल्याने शासकीय मालमत्तेचे लूट होत आहे. सर्वसामान्य ग्रामस्थ व शेतकऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत आता नुकतेच जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारले जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लक्ष घालण्याची गरज व्यक्त होत आहे.
महसूल विभागाचे पथक नावालाच शासनाचा महसूल बुडवून अवैध गौण खनिजाची चोरी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यसाठी प्रशासनाने महसूल विभागाची स्वतंत्र पथके तयार केली आहेत. फलटण तालुक्यात व कापशी परिसरात अनेक दिवसांपासून वाळू उपसा करून अवैधरित्या चोरटी वाहतूक सुरु आहे. मात्र यावर काहीच कारवाई होत नसल्याने महसूल विभागाची पथके नावालाच आहेत की काय असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. यांच्यावर कारवाई व्हावी अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.



















