निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी विकास खोब्रागडे
दि. १८/१०/२०१८
आज 18 ऑक्टो.ला अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखा ,पळसगाव च्या वतीने नालंदा बुध्द विहाराच्या प्रागणात अशोक विजयादशी धम्मचक्र प्रवर्तन दीना चा कार्यक्रम मा,दामोदरजी रामटेके अ, भा,बौद्ध,महासभा,अद्यक्ष ,व प्रभाकर गजभिये सचिव अ, भा, बौद्ध समाज,यांच्या हस्ते धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करून पंचशील फुगे आकाशात सोडण्यात आले, महाकारूनिक शांतीदूत तथागत भगवान बुद्ध व तुमचे आमचे बहुजनांचे उद्धारक बोधिसत्व महामानव विश्वरत्न डा, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,आजचा दिवस विजयादशमीचा,”म्हणजे धम्मचक्र परिवर्तन दिवस
नागपूर येथे १४ आॅक्टोंबर १९५६ ला विजया दशमीच्या दिनी,”महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,यांनी,हिंदू धर्माच्या त्याग करून”बुध्द धम्मांची दिक्षा घेतली व लागलीच लाखो लोकांना दिक्षा देत धंम्माला गतीमान केले.याच धंम्म गतीमानाला,धम्मचक्र परिवर्तन दिवस म्हणतात सदर कार्यक्रमास धम्म उपासक उपसीका व गावातील नागरीक उपस्थित होते,रात्रोला स्नेहभोजन चा कार्यक्रम होऊन रात्रौ ला विहिरगाव,पळसगाव येथील पंचशील भजन मंडळ यांच्या बद्ध भीम गीताचा कार्यक्रम होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली,
विर बाबुराव शेडमाके आदिवासी समाजाच्या वतीने महात्मा रावण महापूजा करून भव्य मिरवणूक काढण्यात आली व रात्रौ ला सामाजिक पर आदिवासी समाजाच्या रूढी आपल्या समाजात रुजली पाहिजेत करीता आदिवासी नृत्य चा कार्यक्रम घेण्यात आला ,त्या कार्यक्रमास मा,सतिषभाऊ वारजूरकर माझी जिल्हा परिषद अद्यक्ष विद्यमान गटनेता चंद्रपूर,रोशन ढोक गटनेता प,स,चिमूर ,प्रमोद गौरकार,छत्रपाल मसराम,गीता शेंडे सरपंच,सुनील ठाकरे,हॅपीज शेख,पोलीस पाटील,रंगीना दडमल, रहमान पठाण,मसूद शेख,,विकास खोब्रागडे निर्भीडपत्रकार,गोपाळ केराम, भक्तदास कोहचाडे,मनोज कुंभरे,जालिंदर कुंभारे यांच्या उपस्थिती मध्ये सदर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले,व रात्रोला प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आला,
त्याच प्रमाणे स्वप्नपुष्प दसरा उत्सव मंडळाच्या वतीने आखाडा ढोल ताश्याच्या आवाजात भव्य दिव्य राम लक्ष्मण हनुमान बँड व झाक्या व देखावा करून गावातील मुख्य मार्गावरून रॅली काडून दसरा उत्सव साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मा सुभाष बनसोड ग्रा,प,सद्यक्स , तुळशीदास शेरकुरे,सदानंद बन्सोड, संजय सोनेकर,विवेक बन्सोड,व गावातील प्रतिष्ठित वेक्ती व तरुण मुले यांच्या उपस्स्थिती मध्ये सदर कार्यक्रम साजरा करण्यात आला,
भारतीय संविधानातील कलम 25 अन्वये देशातील कोणत्याही जनसमुदायाच्या धार्मिक भावना ,दुखावल्या जाणार नाही,तसेच संपूर्ण धार्मिक स्वतंत्र बहाल केले असताना मात्र काही जनसमुदाय कडून दहन महोत्सव आपल्या भारत देशात ही पद्धत सुरू झाली आहे,अशा पध्दती मूळे सामाजिक सहिष्णुतेला तडा जात असून,सांप्रदाहिक कलह निंर्मण होण्यास मदत होत आहे,हे कोडे सुटण्यास नक्कीच समाजप्रबोधन होण्याची गरज आहे,



















