बीड(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि. ११.०५.१९
बीड- देशाचे स्वाभिमानी नेते आमचे आदरास्थाण वंचित शोषित पिडीत समाजाचे सद्य परिस्थितीतले उध्दारकर्ते आमच्या बहुजनांचा बुलंद आवाज,घराणेशाही विरुध्द बंड पूकारूण सर्व सामान्यांना संसदेत पोहचवण्याची ताकत असलेले आमचे आदरस्थान आदरणीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजक मा सम्राट डॉ.जितीनदादा वंजारे खालापूरीकर जिल्हा कोषाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ बीड यांच्या वतीने शुक्रवार (दि.१०) रोजी खालापुरी येथील संजीवनी हॉस्पिटल खालापूरी येथे रुग्णांना फळे वाटप, खालापूरी येथील छावणीवरील सर्व नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी संजीवनी हॉस्पिटल खालापूरी येथे करण्यात आली तसेच खालापूरी परीसरातील गायरान परिसरात राहणाऱ्या पारदि समाजातील कुटुंबीयांना राशन खाऊ व फळे वाटप करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटोळे प्रमूख पाहुणे बौध्द महासभेचे बी डी साळवे,एम आय एम आखील किल्लेदार,आयोजक मा.सम्राट डॉ. जितीनदादा वंजारे खालापूरीकर जिल्हा कोषाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडी तथा जिल्हा महासचिव हिमा डॉक्टर्स संघटना महाराष्ट्र राज्य,जिल्हा उपाध्यक्ष पट्टेकर,सोनवणे,अनिल डोळस, पारदी समाजनेते ईसाम्बर चव्हाण आदी उपस्थित होते.यावेळी डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले देशाचे स्वाभिमानी नेते आमचे आदरास्थाण वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेवरून आम्ही वंचित घटकांसाठी जीवनभर काम करणार आज आम्ही दुष्काळ ग्रस्ताण्साठि आर्थिक मदत, रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी,पारधी समाजातील कुटुंबीयांना फळे खाऊ व अन्न धान्य वाटप केले आहे.
यानंतर प्रमुख पाहुणे बी डी साळवे यांनी डॉ जितीनदादा वंजारे यांच्या कार्याची प्रशंसा केली व आपणही वाटेल ते योगदान देऊ अस आश्वासन दिले.अखिल किल्लेदार यांनी पारधी समाजासाठी कार्य करत असणाऱ्या डॉ.जितिनदादा यांना खंबीर साथ देऊ असा शब्द दिला व साहेबांना शुभेच्छा दिल्या यानंतर आपल्या आध्यक्षिय भाषणात रवींद्र पाटोळे यांनी बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सूचनेवरून आम्ही जिल्हाभरात विविध कार्यक्रम राबवले व शेवटी डॉ जितीनदादा वंजारे यांनी आयोजित खालापूरी येथील कार्यक्रमास उपस्थिती लावली आजच्या या पारधी समाजासाठी च्या कार्यक्रमाने मी धन्य झालो असे उद्धार काढले.डॉ.जितीनदादाचे हे समाजसेवेची कार्य चालू राहू द्या मा.बाळासाहेब आंबेडकर यांच कार्य तळागाळात पोहचवा आम्ही आपल्या पाठीशी आहोत असा सल्ला दिला.यावेळी गावात विविध ठिकाणी कार्यक्रम घेतले हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ जितीनदादा वंजारे,संजीवनी वंजारे,गोरख वंजारे,बाप्पू वंजारे,लहू वंजारे, काळू वंजारे,मोहन इन्गावले,दादा वंजारे,आदींनी विशेष परिश्रम घेतले यावेळी बापू जोगदंड,भैया लोंढे,सुरेश ऊगले,नवनाथ गवळी, नीलेश गवळी,ईसाम्बर चव्हाण गावातील ग्रामस्थ,मित्रमंडळी सर्व नातेवाईक उपस्थिती होते.



















