चंद्रपुर (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी विकास खोब्रागडे
चंद्रपूर, जिल्हातील आदिवासी गोवारी समाजाचा उच्च न्यायलयची निर्णयांची अमलबजावणी करण्या करीता. आदिवासी गोवारी समाजाचा वतीने चंद्रपूर जिल्हातील चिमूर तालुक्यातील शेकडो आदिवासी गोवारी बांधव मूक मोर्चा साठी रवाना झाले आहेत,गोवारी बांधव आदिवासी असल्याच्या ऐतिहासिक निर्णय मुंबई न्यायलयचा नागपूर खंडपीठाने दिला आहे,या निर्णयामुळे गोवारी बांधवाना अनु जमाती समाजाचे आरक्षण मिळणार आहे. तब्बल २३ वर्षी पूर्वी म्हणजे २३ नोव्हेंबर १९९४ ला गोवारी बांधवांचा आरक्षण मिळावे या करिता मोट्या संख्याने नागपूर येथे हिवाळी अधिवेशनवर मोर्चा काढला होता. त्या वेळी पोलीसच्या लाठीमारानंतर चेंगराचेंगरी होहुन ११४ गोवारी बांधवांचा मृत्यू झाला होता हे मात्र विशेष अखेर गोवारी समाज आदिवासी असल्याचा निर्णय उच्च न्यायलाने दिला असून त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता आज जिल्हा अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे मोठ्या संख्याने विशाल स्वरूपात मूक मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा चे नेतृत्व मा. वासुदेव ठाकरे जिल्हा अद्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक व बी डी शेंदरे जिल्हा सचिव यांच्या नेतृवात जिल्हा ग्राउंड वरून सदर मोर्चा निघणार असून जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन दिल्या नंतर मोर्चाचे सभेत रूपांतर होहून मान्यवरचे मनोगत वेक्त करून या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असे गोवारी बाधवाणी ठाम निश्चय केला आहे.



















