उस्मानाबाद (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, अभय गायकवाड
दि.६.१२.१९
उस्मानाबाद- उस्मानाबाद येथील आरटीओ उपप्रादेशिक अधिकारी यांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांच्यावतीने दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला याबद्दल सविस्तर वृत्त असे की
कळंब तालुक्यातील येरमाळा येथील ट्रक चालक संजय बारकुल हे मागील बऱ्याच दिवसापासून पुणे येथे ट्रक चालवण्याचे काम करत होते त्यांच्या वाहन चालक परवाना च नूतनीकरण मर्यादा संपत आली असल्याने त्यांनी ऑनलाइन नूतनीकरणाचा अर्ज भरला त्या अनुषंगाने त्यासाठी असणारा चलन देखील त्यांनी भरलं होतं परंतु सहा महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी बारकुल यांचा परवाना नूतनीकरण होत नव्हते परिणामी त्यांना तीन महिन्यापूर्वी काम सोडावे लागले यादरम्यान त्यांना ७०ते ७५ हजार रुपये एवढे नुकसान देखील सहन करावे लागले बेरोजगारी व कामासाठी होत असलेली दिरंगाई याला कंटाळून बारकुल यांनी उपप्रादेशिक अधिकारी यांना वकिलामार्फत नोटीस बजावली व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांच्याकडे रीतसर तक्रार देखील केली या तक्रारीवर लक्ष देत ग्राहक तक्रार मंचाकडून बारकुल यांना न्याय मिळाला व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दहा हजार रुपयांचा दंड देखील झाला सद्यस्थितीत कार्यालयाच्या आवारात खाजगी दलालांचा सुळसुळाट आहे दलालामार्फत काम न करता ऑनलाईन प्रणालीचा वापर केल्यास कार्यालय जाणिवपुर्वक दिरंगाई करते अशी चर्चा नागरिकात नेहमी असते आता ग्राहक मंचाच्या या कार्यवाही मुळे आरटीओ कार्यालयातील प्रशासन ताळ्यावर येईल का असा प्रश्न नागरिकातून विचारला जात आहे.



















