सोलापुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधि,संतोष पवार
करमाळा- खेडेगाव म्हटल की समस्या आल्याच तालुक्यातील सीना नदी काटचे तरट गाव येथील ग्रांमपंचायतने मागासवर्गीय वस्तीत तीन महिन्या पासुन पाण्याची टाकी बांधन्यासाठी खड्डा खोदुन ठेवला आहे, परंतु अध्यापही काम पुर्ण झालेले नाही. त्या खड्या पासुन लहान मुलांना तसेच जनावरांना धोका आहेच पण खड्यामुळे मोठी दुर्घटना घडु शकते.दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? ग्रांमपंचायत याकडे लक्ष देत नाही.तसेच गावात स्मशान भुमी नाही.तरटगाचे ग्रांमपंचायत सदस्य कचरु जगदाळे यांनी वारंवार पाठपुरावा करून देखील.ग्रांपचायत या कडे लक्ष देत नाही.या वरून असे वाटते की प्रशासन मागासवर्गीय वस्तीत दुर्घटना घड्याण्याची वाट तर पाहत नाही ना? असा प्रश्न मागासवर्गीय वस्तीतील राहवासी यांना पडल्या शिवाय रहात नाही.



















