सोलापुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)करमाळा, प्रतिनिधी, संतोष पवार
दि.०९.१२.१९
करमाळा- तालुक्यातील मांगी व कोळगाव धरण व इतर छोट्या मोठ्या प्रकल्पात कुकडीचे पाणी सोडण्याची विनंती आमदार रोहितदादा पवार यांना करमाळा राष्ट्रवादी तर्फे करण्यात आली.अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सोशल मीडियाचे नितीनभाऊ झिंजाडे यांनी दिली.याबाबत दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,कुकडी प्रकल्पातील पाणी करमाळा तालुक्यातील मांगी,कोळगाव,वीट,राजुरी सह इतर तलावामध्ये पाणी सोडणे गरजेचे आहे.यावर्षी तालुक्यामध्ये उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवणार असून यामुळे फळबागा,जनावरे व माणसांना लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याची समस्या उदभवणार आहेे.मांगी तलाव व सीना नदीतून कोळगाव धरण भरले तर निम्म्या तालुक्यातील पाण्याची समस्या संपणार आहे.तरी आपण या प्रकरणी वयक्तिक लक्ष घालावे. ही विंनती निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी २५ तारखेला करमळ्यासाठी पाणी सुटणार व करमळ्यातील प्रश्नासंबंधी लक्ष घालणार असल्याच रोहितदादा पवार यांनी सांगितल.यावेळी
नितीनभाऊ झिंजाडे, धनंजय ढेरे, सचिनराजे नलावडे
चंद्रकांत जगदाळे हे उपस्थित होते.



















