पिंपरी-आर्वी जि.वर्धा येथील मंदिरात देवदर्शनाला गेलेल्या मातंग समाजातील कु.आर्यन गजानन खडसे या निष्पाप लहान मुलाला मंदिरात गेला म्हणून पाखंडी रूढीचा देव बाटला म्हणून तापत्या उन्हात गरम झालेल्या स्टाईल फरशीवर निरवस्त्र बसवून छळ करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या घटनेमुळे त्या बालकाचा पाश्वभाग हा पुर्णपणे भाजून निघाला आहे . माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार निंदनीय असून फुले,शाहू,आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारा आहे. महाराष्ट्रात वारंवार असे प्रकार घडत असताना राज्य शासन आणि प्रशासन केवळ बघ्याची भुमिका घेत आहे.त्यामुळे दलित समाजात तिव्र भावना व्यक्त होत आहेत.
तरी संबंध समाज बांधवांच्या वतीने आपणांस विनंती आहे करत कु.आर्यन गजानन खडसे यांस आर्थिक २५ लाख रुपये पुनर्वसनासाठी सरकारने द्यावेत व या आरोपीस कठोरातील कठोर कारवाई करावी जेणेकरून पुन्हा अशा घटना घडणार नाहीत. अशा प्रकारे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी मारूंजी गावचे प्रभारी सरपंच संदिप जाधव,बाळासाहेब खंदारे,संजय गांधी निराधार अनुदान योजना महाराष्ट्र शासन अध्यक्ष नितीन घोलप,मातंग एकता आंदोलन युवक आघाडी शहराध्यक्ष विशाल कसबे,संघटक विठ्ठल कळसे,सहसचिव अविनाश सोनपाखरे आदी उपस्थित होते.



















