चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२५.०३.२०२०
नागभीड- कोरोणा विषाणूची लागण होऊ नये म्हणून भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य सरकारने २२ मार्च पासून ३१ मार्च २०२० पर्यंत, कोरॉना प्रतिबंध उपाय म्हणून कलम १४४ लागू करण्यात आली आहे. तथा काल रात्री १२ वाजे पासून भारत सरकारने कोरोनावर रामबाण उपाय म्हणून लॉकडाऊन २१ दिवसा करीता जाहीर केलेला आहे. लोकांनी एकमेकांच्या संपर्कात राहणे यातून लागणं होते. जगाच्या पाठीवर कोरोना विषाणू ने थैमान घातले असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून लोकांनी एकमेकांच्या संपर्कात येऊ नये यासाठी पोलिस यंत्रणा, आरोग्य विभाग, महसूल विभागाने तालुका स्तरावर सतत सतर्क राहून चोख प्रत्युत्तर देत आहेत. मुंबई, पुणे येथून आलेल्या विद्यार्थी,व जे आपली पोटाची भूक भागविण्या करिता कामाला गेलेल्या यांची तपासणी केली जात आहे. आवश्यक सेवेच्या माध्यमातून काही माणसे फिरत आहे यावर पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारणा करून त्यांना सोडून देत आहे. जनतेनी स्वतः कोरोना आजारा पासून दूर राहण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन सरकारला सहकार्य करा असे आवाहन तालुका स्तरावर प्रशासनाकडून करण्यात येत आहे.



















