नाशिक(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, प्रवीण जाधव
येवला- कोरोना विषाणू च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय येवला तालुक्यातील राजापूर ग्रामपंचायत प्रशासनातर्फ येतील रविवार चा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, २९ ते ३० मार्च रोजी राजू मनशाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय ही गावकरी मंडळी ने घेतला आहे.
राजापूर आठवडे बाजारात ममदापूर, सोमठाणे जोश, लोहशिंगवे,सोयगाव, कोळगाव आदी गावांचे नागरिक हजेरी लावतात. तालुक्यातील व्यापारी माल विक्रीसाठी आणत असतात. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाने आक्रमक पावले उचलली आहेत. गर्दी होणारी सर्व ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. शासकीय आदेशाच्या अनुषंगाने राजापूर ग्रामपंचायतिने रविवारी होणारा आठवडे बाजार बंद करण्यात येऊन यात्रा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आठवडे बाजार व यात्रा बंदीमुळे काहीसा त्रास होणार असला तरी कोरोना व्हायरसच्या धर्तीवर हा निर्णय योग्यच असल्याची भावना शेतकरी, व्यावसायिक, व्यापारी व नागरिकांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भातग्रामपंचायतीने लाउड्स्पिकरद्वारे सूचना देत सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.



















