सातारा:(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, शिवाजी भोसले
दि.२४.०३.२०२०
फलटण- कोरोनाच्या प्रादुर्भावाने देशभरातील वातावरण ढवळून निघाले आहे. आपला महाराष्ट्र सर्वाधिक कोरोनाबाधित असल्याने हि येणाऱ्या काळात मोठी धोक्याची घंटा आहे. यासाठी मुख्यमंत्रांनी संचारबंदीसोबत आंतरजिल्हा बंदीचाही निर्णय घेतला.या मोहिमेला साथ देण्यासाठी फलटण तालुक्यातील खराडेवाडी येथील तरूण सरसावले आहेत.
गावातील ग्रामस्थ व सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली बाहेरून येणाऱ्या व्यक्ती व फेरीवाले यांना गावामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे व गावातील ग्रामस्थांना कामाच्या व्यतिरिक्त बाहेर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे अन्यथा कोणीही गावाबाहेरील गावांमध्ये आल्यास किंवा बाहेर गेल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल व शासनाच्या नियमानुसार, शासनाच्या कायद्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
गावामध्ये बाहेरच्या पाहुण्यांना प्रवेश बंदी केली असून गावातील ग्रामस्थास बाहेर जाण्यास बंदी घातली आहे. गावाच्या वेशीवर लाकडे झाडे टाकून रस्ता बंद करण्यात आला आहे.



















