गडचिरोली(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३०.०७.२०२२
गडचिरोली- परिसरात शेतकऱ्यांना जमिनीची मशागत करून, उत्पादन घेऊन उपजिवीका करता यावी या उदात्त हेतूने शासनाकडून जमीनीचे वाटप करण्यात आले. परंतु शहरातील काही महाभागांनी पैशाच्या जोरावर जमीनी विकत घेऊन प्लाट विक्री सुरू केली आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी पराकोटीने लक्ष केंद्रित करून असे प्रकार थांबवावेत व जनतेला योग्य न्याय द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. गडचिरोली शहरात प्लाट खरेदी विक्रीचा व्यवसाय जोमात सुरू आहे. या व्यवसायात एजंट म्हणून काम करीत असनारे लोक भूदान-पट्ट्याच्या जमीनी प्लॅाटीग करून विकत आहेत. अशा जमिनी विकल्या गेल्या तर अनेक शेतकरी भूमीहीन होऊन उपजीविकेचे साधनांपासून वंचित राहातील. शासनाने उपजिवीका करण्यासाठी दिलेल्या जमीनी या जिल्हाधिकारी किंवा तत्सम अधिकारी यांच्या परवानगी शिवाय विकता येत नाहीत असा नियम असला तरी जमीनी विकत घेऊन प्लॅाट विक्रीचा व्यवसाय जोमाने सुरू आहे. यासाठी महसूल विभागच छुप्या मार्गाने परवानगी देत आहे का? असा प्रश्न जनतेकडून उपस्थित केला जात आहे. प्लॉट तयार करतांना शासकीय कार्यालयात जाऊन बरेच कागदपत्र तयार करावी लागतात. त्यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचारी डोळे झाकून काम करतात का? गडचिरोली शहरालगत असलेल्या नवेगाव, कोटगल, इंदाळा, पारडी परिसरात अनेक शेतकरी, कामगारांना उपजिविका करण्यासाठी शासनाने शेतजमीन दिली आहे. मात्र या जमीनी प्लॅाट करून विविध प्रकारच्या मार्गाने विकली जात आहे. अनेक महाभाग अशा जमीनी विकत घेऊन ले आऊट टाकून बिनधास्तपणे विकत आहेत. सद्यास्थितीत कोटगल येथील वसंत मेश्राम यांना शासनाकडून मिळालेली जमीन श्याम कश्यप यांनी विकत घेतल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
वसंत मेश्राम भूमीहीन होणार नाही यासाठी श्याम कश्यप यांनी आगळे वेगळे मार्ग शोधून भूदानाची मिळालेली जमीन विकत घेण्याचा कट रचला आहे. श्याम कश्यप यांनी प्लॅाट विक्रीचा व्यवसाय करीत असताना सोबत असलेल्या बिझनेस पार्टनरचीही फसवणूक केल्याचे चर्चिले जात आहे. या जमिनीची विक्री केल्यावर लाभांशची रक्कमही दिली जात नाही. लाभांशची रक्कम मागीतली असता टाळाटाळ केली जाते. लाभांशची रक्कम अदा करण्यासाठी दिलेले धनादेशही वठत नाहीत याबाबत जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.



















