चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी, योगेश्वर पि. शेंडे
दि.१२.१२.१९
नागभिड- तालुक्यातील गोविदपुर येथील श्री.मुखरु मठु मेश्राम याच्या शेतातील उभी असलेली धानाची पूजने डिबलीला काल रात्रीच्या सुमारास आग लागुन संपुर्ण धानाची राख झालेली आहे. या मुळे शेतकऱ्यावर खुप संकट ओढवले असून सदर प्रकारामुळे हाती तोंडी आलेलें घास हिरावल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे,सदर शेती हि गोविंदपुर हलक्यातील गट नं. ५४५ असुन शेती ही १ हेक्टर आहे ती शेती श्री. मुखरु मठु मेश्राम यांची मालकीची जागा असुन ही शेती श्री. निरज गजानन चन्ने गोविंदपुर यांनी ठेख्याने केलेली आहे. काल रात्री हि आग आगलेली असुन आज सकाळी हि घटना लक्षात आली पंरतु ती संपुर्ण पणे राख झाली असल्यामुळ तीथला इकही धान हातात आलेला नाही अवकाळी पावसामुळ पहिलेच धानाची नुकसान झाले व आता ही घटना त्यामुळे निरजजी चन्ने यांना खुप मोठा धक्का बसलेला आहे कारण ही शेती त्यानी भाड्याने केली असुन त्यांचे खुप मोठे नुकसान झालेला आहे. एकीकडे शेती ही ठेक्याने केलेली असुन त्या शेतीमध्ये लागलेला खर्च व शेतीसाठी आलेला ईत्तर खर्चाचा विचार केला तर त्यांचा त्या शेतीमध्ये खुप मोठ्या प्रमाणात नुकसान सहन कराव लागत आहे त्यांना ही घटना कळताच ते शेतावर पहानी करायला गेले तर संपुर्ण पूजने डीबली हि पेटत होती तिथुनच त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन व तलाठी व कृषी खात्याला त्यानी फोण द्वारे कळविले असता तळोधी (बा.) पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी यांनी पंचनामा केलेला आहे.पहिलेच शेतकरी हे अवकाळी पवसामुळे खुप मोठे नुकसान व दुसरीकडे धाना भाव नाही व त्यातच त्यानी ही शेती ठेक्याने केलेली असुन त्याशेतात ऐवढी मोठी नुकसान झाल्याचे पाहुन त्यांच्यावर खुप मोठा संकट आलेला आहे त्यांना आता शासनाकडुण मदतीची आवश्यकता असल्याचे कळविले.



















