चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
दि.१९.०५.१९
चिमूर- पळसगांव येथे बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून जगाला शांतीचा आणि मानवतेचा संदेश देणार्या महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांची शिकवण प्रत्येक घरात पोहोचावी आणि बुद्धांचा धम्म प्रत्येकाने आचरणात आणावा व सदैव त्याचे स्मरण ठेवावे,या उद्देशाने शांती ज्योत पदयात्रेचे आयोजन दिनांक १८ मे ला पळसगांव येथे करण्यात आला. या शांतिज्योत पदयात्रेचा प्रारंभ सायंकाळी साडेसहा वाजता नालंदा बुद्ध विहार येथून करण्यात आला होता.बौद्ध नगरातील प्रत्येक घरातील उपासक बुद्ध विहारांकडून शांती ज्योती पदयाञेचे आगमन करीत होते. शांती ज्योत पदयात्रेची समाप्ती नालंदा बुद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे झाली.या शांती ज्योत पदयात्रेत उपासिका व उपासक सहभागी झाले होते.रात्री ला स्नेभोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली,



















