सोलापुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधि,संतोष पवार
दि.०५.०७.१९
करमाळा- मा.मुख्यमंत्र्याच्या आदेशानुसार घरकुल लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास वाळु देण्याचे जाहिर केलेले आहे.मा. जिल्हाधिकारी यांनी देखील तसे आदेश दिल्याचे वर्तमानपत्रातुन बातम्यांद्वारे सांगण्यात आले आहे.करमाळा तालुक्यात वाळु अभावी गोरगरीबांची घरकुले अपुर्ण अवस्थेत आहेत वाळुचे भाव गगनाला भिडलेले आहेत.हे भाव सर्वसामान्य लोकांच्या अवाक्या बाहेरचे आहेत.तरी मा. मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार सदरिल वाळुचा लाभ जर घरकुल लाभार्थ्यांना न मिळाल्यास रिपाई (A) च्या वतीने ०९.०७.२०१९ रोजी दुपारी १२:३० वा. पंचायत समिती कार्यालया समोर हलगी नाद आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रिपाई(A) नागेशदादा कांबळे यांनी प्रशासनाला दिले आहे.



















