चंद्रपुर(निर्भीड न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१२/२/१९
🌑 नेतृत्व:- भदन्त ज्ञानज्योत महाथेरो
🌑 संघारामगिरी(रामदेगी)येथे कायम कुलूप लावण्याचा हेतुपरस्सर वनविभाग प्रशासनाचा जाहीर निषेध
चिमूर,जगभरातील करोडो बौध्दांचे श्रद्धा स्थान असलेल्या तालुका चिमूर चंद्रपूर जिल्ह्यातील संघरामगिरी (रामदेगी) या पवित्र धर्मस्थळाकडे शासनाच्या वनविभागाने केलेली वक्रदृष्टी ही अतिशय गंभीर बाब आहे. प्राचीन बौद्धकालीन संदर्भ लाभलेल्या हया स्थळावर गेल्या काही वर्षापासून बौद्ध भिक्खूचे वास्तव्य असून ध्यान साधनेत रत पवित्र जीवन व्यतीत करत आहेत. पवित्र धर्मतरंगानी ही भुमी पुणित झालेली आहे. हजारोंच्या संख्येने दरवर्षी ३१ जानेवारी ला श्रद्धावंत उपासक मोठ्या श्रद्धेने इथे येतात व पुण्यसंपादन करून जातात. याची जाणीव शासन प्रशासनाला असून देखील ते भिक्खूसंघाला तिथून घालवून लावण्याचा बेत वनविभागाने आखलेला दिसतो. ही गोष्ट निश्चितच दुर्दैवी आहे. कुठल्याही परिस्थितीत असे घडू नये. शासनाने योग्य तोडगा काढून भिक्खूसंघाला शासनाने सन्मान पुर्वक कायमस्वरूपी निवासस्थानांची व्यवस्था करून धर्मगुरूंचा योग्य सन्मान करावा याची सम्यक जाणीव वनविभागाला व्हावी यासाठी पूज्य भत्ते ज्ञानज्योती महाथेरो यांचे नेतृत्वाखाली आज ला चिमूर तहसील कार्यालयावर मुक मोर्चाचे आयोजन केले होते महाथेरो भदंत ज्ञानज्योती यांच्या संघर्षमय जिवनात तथागत भगवान बुध्दांच्या तत्वज्ञानाचे महत्त्व अनन्य साधारण आहे.पुरातन काळात संघारामगीरी हे स्थळ बौध्द भिख्खुंच्या वर्षवासाचे व राहण्याचे प्रमुख केन्द्र राहिलेले आहे.आज याच कर्मभुमीला तपोवन बुध्दि विहार महाप्रज्ञा साधना भुमी संगारामगीरी या नावाने अख्खा जगभरात या स्थळाला जाणतो आहे.अशा इतिहासीक बौध्द स्थळाला,ब्रम्हपुरीच्या व चंद्रपूरच्या वनविभागाने हटवण्यासाठी कटकारस्थान रचले आहे.या कटकारस्थानाला परतवून लावण्यासाठी आज चिमुर तहसील कार्यालयावर पू.भदंत ज्ञानज्योती यांच्या नेतृत्वात महामुक मोर्चा आयोजन केले होते.
सदर मोर्चा तक्षशीला बुध्द विहार चिमुर या ठिकाणा वरून हजरोच्या उपस्थती मध्ये मुख्य रोड ने महामुक मोर्चाला दुपारी १२ वाजता प्रारंभ करण्यात आला .हा माहामुक मोर्चा उपविभागीय कार्यालय तहसील कार्यालय चिमुर येथे मुख्य रोड वरती बसून जो पर्यंत आमच्या मागण्यांचे निवेदन मोर्चा स्थळी येहून स्वीकारावे असे मोरच्या करायचे मत होते.
सभेत मा,आमदार जोगेंद्र कवाडे सर यांनी आपल्या रोखठोक भाषण शैलीत मनोगत वेक्त करताना तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या नावावर जगात भारत देश्याची ओळख आहे.आपले पंतप्रधान,मुखमंत्री,जपान, इंग्लड,अमेरिका या देशात गेले की बुद्धाची मूर्ती देतात भारत ही बुद्धाची भूमी आहे.पण या सरकारने फक्त बुद्धाच्या तीर्थस्थळा ला टार्गेट केले आहे आम्हीं तथागत बुद्धाचे अनुयाही असलो तरी वेळे प्रसंगी क्रांती करू शकतो चिमूर ही क्रांतिकाराची भूमी आहे असे मत वेक्त केले.वन गेट उभारून जणू यांनी टोल टॅक्स वसुली चालू केली आहे.
मा. लेडी गव्हर्नर कमलताई गवई यवतमाळ यांनी आपल्या मनोगत वेक्त करताना सांगितले की राजकारणाशी उशी घेऊन झोपलेल्या सरकारला जागे करण्याची गरज आहे जर आमच्या धार्मिक स्थळाला मुक्त न केल्यास आम्ही गप्प बसणार नाही वेळे प्रसंगी आम्ही महिला सुधा आक्रमक होतील.
आज दुपारी,३.१९ मिनीटांनी मा.उपविभागिय अधिकारी मा.बेहरे साहेब,तहसीलदार मा,नागतीलक साहेब यांनी मोर्चा स्थळी येहून मागण्याचे निवेदन स्वीकारले व पुढील कार्यवाही साठी वरिष्ठअधिकारी वर्गा कडे सकारत्मक पाठविण्यात येईल असे निवेदन मा बेहेरे सर नि केले.
या नंतर मा.प्रज्ञाज्योति महाष्टविर यांनी आपल्या मनोगत वेक्त करताना म्हटले की ईव्हीएम मुक्त निवडणूक घेणे आजची गरज आहे.
तथागत भगवान गौतम बुध्दांच्या नावावर जगात भारत देशाची ओळख आहे तथागत भगवान बुध्दांमुळे भारत देशाला जगात मानसन्मान मिळतो आहे मात्र हा भारत देशातील राज्यकर्त्यांचा व प्रशासकीय यंत्रणांचा नाकार्तेपणा म्हणायचे कि छडयंत्राचा भाग समजायचा.जर आम्हाला जागा उपलब्ध करुन दिली नाही तर आम्ही त्या ठिकाणावरून हटणार नाही या नंतर आम्ही तुमच्या कडे येणार नाही जर तुम्ही आमच्या कडे याला तर सकारत्मक चर्चा करून वेळे प्रसंगी तुम्हाला दुसरी जागा देहून तिढा सोडवा असे मत वेक्त केले या नंतर मोर्च्याकरांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.आज होणाऱ्या या नंतर मुक मोर्चा विसर्जित करण्यात आला या माहामुक मोर्च्याला हजारोंच्या संख्येनी बौध्द बांधवांनी उन्हात उपस्थिती दर्शीवेली या वेळी मा.इंगोले सर,मडामे ठाणेदार साहेबांच्या उपस्थिती मध्ये चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.



















