सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, अनिल माने
दि.२२/३/१९
पाटण तालुक्यातील तामकडे या गावामध्ये दि.२०मार्च रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास राजाराम बापू पवार यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या खळ्याचा माळ येथे त्यांचे जनावरांचे शेड आहे.या शेडाला अचानक लागलेल्या आगीमधे ११ जनावरांन पैकी ६ जनावरांचा मृत्यु झाला.या आगीमधे २ बैल, १ रेडकू, २ गाई, १ वासरू असे सहा जनावरांचा जागीच मृत्यु झाला. बाकीचे जनावरे ९० % पेक्षाही भाजलेली असून ती अतिशय गंभीर अवस्थेमधे आहेत. त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरू आहेत.
सदर माहिती अशी की राजाराम बापू पवार राहणारा तामकडे या शेतकऱ्याची एकूण ११ जनावरे होती त्या जनावरांचे शेड त्यांच्या घरापासून काही अंतरावर त्यांच्या खळ्याच्या माळरानामधे होते त्या माळरानावर असणाऱ्या शेडामध्ये ती सगळी जनावरे बांधलेल्या अवस्थेमधे असताना त्यांच्या माळरानामधे अचानक लागलेल्या आगीमधे त्यांचे शेड पूर्णपणे जळून खाक झाले.शेडामधे असणाऱ्या ११ जनावरांन पैकी ६ जनावरे आगीमधे होरपळून जागच्या जागीच ठार झाली. काही जनावरे बांधलेले दावे तोडून सगळ्या माळराणात पळत सुटली हा सर्व प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. व ग्रामस्थांनी अग्निशामक दलाला कळविले व अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी येऊन त्या आगीवर नियंत्रण आणले.
पाटण तालुक्याचे महसूल खाते व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. जी जनावरे जिवंत अवस्थेत आहेत ती ९०% पेक्षा जास्त भाजल्याने त्यांच्यावर पशुधन वैधकीय अधिकाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केले आहेत.मात्र ती जनावरे ९०% भाजलेली असून त्यांची जगण्याची शक्यता नाही असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्याचबरोबर त्यांच्या माहितीतून स्पष्ट केले की राजाराम बापू पवार जळीतग्रस्त शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचे एकूण नुकसान ६ ते ७ लाखापर्यंत झालेले असून शासनाकडून जेवडी मदत करता येईल तेवडी मदत आम्ही करणार आहोत.
राजाराम बापू पवार या जळीत ग्रस्त शेतकऱ्याचा उदरनिर्वाहाचे पशुपालन हे प्रमुख साधन होते ते साधन संपले असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तरी ज्या काही धार्मिक, सामजिक, राजकीय संघटना आहेत ज्या अनेक धार्मिक व आध्यात्मिक कामासाठी मदत करत असतात त्यांनी राजाराम बापू पवार यांच्या सह अशा अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांनी पुढे येवून सडळ हाताने मदत करावी असे आव्हान सातारा जिल्हा युवा विध्यार्थी/विद्यार्थिनी सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शुभमजी उबाळे यांनी घटनास्थळी केले आहे.



















