पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.२०.०६.१९
वाकड- प्रभाग क्रमांक २६ अण्णाभाऊ साठे नगर येथे रविवारी सकाळी अपना वतन संघटनेच्या वतीने संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली त्यावेळी तेथील स्थानिक नागरिकांशी संवाद करण्यात आला.तेथील नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या. आण्णाभाऊ साठेनगर मध्ये कचरा नेहण्यासाठी घंटागाडी येत नाही,त्यामुळे कचरा इतरत्र टाकतात व त्यामुळे घाण पसरून दुर्गंधी निर्माण होते.अण्णाभाऊ साठेनगर व टेलिफोन वसाहत यांच्यासाठी असलेली कचरा कुंडी नेहमी कचरा ओसंडून वाहत असतो.तो कचरा ८-१० दिवस उचलला जात नाही.उलट बाहेरचा कचरा त्या कुंडीत आणून टाकला जातो.कचरा वाहतूक विभागाचे अधिकारी गाडी उपलब्ध नसल्यची कारणे देतात त्यामुळे कचरा रस्त्यावर पसरून घाण व दुर्गंधी पसरते.या परिसरामध्ये डुकरांची संख्या मोठ्या प्रमाणवर आहे याबाबत सुद्धा पशुवैद्यकीय विभागाचे दुर्लक्ष होत आहे.अण्णाभाऊ साठेनगर मध्ये सध्या काँक्रिटी चे काम चालू आहे. परंतु ते अतिशय निकृष्ठ दर्जाचे आहे. या मध्ये खाडी आणि धस वापरून २० मिमी पेक्षा कमी माल टाकला जात आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असून या कामामध्ये मोठ्या प्रमाणवर भ्रष्टचार झाल्याचे दिसत आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी.अण्णाभाऊ साठेनगर मध्ये स्वछ भारत अभियानांतर्गत स्वछतागृह बांधण्यात आली त्याचे अनुदान प्रत्यक्ष लाभार्थीला न ठेकेदारनमार्फत ते स्वछतागृहे बांधण्यात आली ती सुद्धा अनुदानाच्या तुलनेत अतिशय निकृष्ट दर्जाची बांधलेली आहेत. या कामामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणवर भ्रष्टचार झाला आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी.अण्णाभाऊ साठेनगर मध्ये मोठा नाला असून त्या नाल्यामध्ये प्रचंड घाण साचलेली आहे. तो नाला स्वछ करण्यात यावा. व त्याठिकाणी भूमिगत पाईपलाईन टाकण्यात यावी.येथील ड्रेनेज लाईन बांधून सहा महिने झाले नाही तोवर चोकअप व्हायला सुरु झाली आहेत. टायचा स्लोप व्यवस्थित दिलेला नाही.तसेच मानकांनुसार गुणवतेची काम करण्यात आलेले नाही.येथील स्ट्रीट लाईट पोल माघील २ महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांना त्रास होत आहे.त्यामुळे स्ट्रीट लाईट ची दुरुस्ती करून तातडीने सुरु करावीत.अण्णाभाऊ साठेनगर येथील नागरिकांसाठी स्वतंत्र रस्त्याची आवश्यकता असल्याने त्या रस्त्याची व्यवस्था तातडीने करावी.येथील नागरिकांना दूषित व अनियमित पाणीपुरवठा होत आहे.त्याबाबत तातडीने उपाययोजना करावी.स्मार्ट सिटी असणाऱ्या महापालिका हद्दीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने राहणाऱ्या वस्तीकडे पालिका प्रशासनचे व लोकप्रतिनिधींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून त्याना अतिशय हीन दर्जाची वागवणूक दिली जात आहे. वरील सर्व समस्यांबाबत पुढील १० दिवसांमध्ये बैठक घेऊन तोडगा काढावा.अन्यथा अपना वतन संघटनेच्या वतीने अण्णाभाऊ साठे नगर मधील नागरिकांच्या सोबत दि. २९/०६/२०१९ रोजी सकाळी ११वा.ड प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढून पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनविरोधात जन आंदोलन केले जाईल.असे निवेदन संघटनेच्या शहराध्यक्ष सौ.राजश्री शिरवळकर यांनी पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहे.



















