सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अनिल माने
दि.१८.०६.१९
पाटण- मराठवाडी धारणासाठी भूसंपादन केलेल्या जमीनी बाबत शासनाच्या अधिकाऱ्यांनी काही चुका केल्या आहेत त्याबाबत काही शेतकऱ्यांनी व महीला शेतकऱ्यांनी जाब विचारता संबंधीत महिला शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषेत अवमानकारक तलाठी सर्कल यांनी भाषा वापरल्यामुळे संबंधीत शेतकऱ्यांमधे प्रचंड संताप व्यक्त होत आहे.या घटनेचा किसान शेतकरी संघटना व तालुक्यातील सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.
ही खबर शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष मा.शंकरावर गोडसे यांना मिळताच तातडीने संबंधीत अधिकारी कर्मचारी यांना भेटून त्यांना योग्यती समज देताना ते असे म्हणाले की आम जनतेशी बेजबाबदार वर्तन करणाऱ्या पोलीस कर्मचारी,तलाठी सर्कल किंवा तहसीलदार प्रशासनातील जबाबदार पदाधिकारी कोणीही असो जर तुम्ही तुमची प्रशासकीय जबाबदारी सोडून बेताल वागाल तर याद राखा कारण पाटण तालुक्यात पोलीस,तलाठी व तहसीलदार यांची लोकसंख्या किती आहे? विचार करा आणी खबरदारीने वागा अन्यथा आम्हाला गांधीजींचा मार्ग सोडून ब्रिटीश सरकारला जरब बसवून वठणीवर आणणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटलांचा मार्ग धरावा लागेल आणी त्यावेळच्या सर्व परिणामांची जबाबदारी सुद्धा तुमचीच असेल असा क्रांतीकारी इशारा प्रशासनातील बेशिस्त अधिकाऱ्यांना किसान मंच शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष मा.श्री शंकरराव गोडसे यांनी दिला आहे.



















