चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
चिमूर, तालुक्यातील पळसगांवपि) येथील स्मशानभूमीची गेल्या काही वर्षापासून दुरवस्था झाली असून स्थानिक पदाधिकारी यांचे मात्र या समस्या कडे डोळेझाक सुरू आहे.पळसगांव येथील स्मशानभूमी टिनाचे छत्र पावसामुळे उडाले असल्याची माहिती ग्राम पंचायत कडून मिळाली आहे. स्मशानभूमी परिसरातील काटेरी झुडपे वाढलेली आहेत.पावसाळ्यात अंतसंस्कार करताना अडचणीचा सामना करावा लागतो तर उन्हाळ्यात मात्र तिथे उभे राहणे शक्य होत नाही.या समस्या कडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे सुसज्ज स्मशानभूमी उभारण्याची मागणी नागरिकां कडून केली जात आहे.



















