चंद्रपूर (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
दि. ८.१२.१९
चिमूर- या वर्षीच्या पावसाळ्यात संतत पावसामुळे व अतीवृष्टीने मुळे सामन्यांना बेजार केले आहे, या पडलेल्या अति मुसळधार पाऊस व गावालगत ची बोडी फुटल्यामुळे पुरामध्ये अनेकांच्या घराची पडझड झाली होती. पळसगाव वासीय पुरग्रस्तांना
३८ पुरग्रस्तांना २ लाख ५९,२०० रुपयाचे धनादेश आज वाटप करण्यात आले, तालुक्यातील पळसगाव येथे ४ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टि आणी गावा लगत असलेल्या बोडीची पार फुटल्याने हाहाकार माजले. गावातील १२२ घर अंशता क्षती ग्रस्त झाले तर ३८ घर हे पुर्णता जमिनदोस्त झाले. पुर्णता क्षतिग्रस्त ३८ कुंटूबांना तब्बल तिन महिन्याने खावटीचे धनादेश वाटप करण्यात आले .
तालुक्यात झालेल्या पावसाने शेत पिकांचे नुकसान झाले तसेच या मूसळधार पाऊसाचा सर्वाधिक फटका हा पळसगावला बसला गावा लगत असलेल्या बोडीची पार फुटल्याने गाव जलमय झाला होता. महसुल विभागा कडून झालेल्या नुकसानी चौकशी करण्यात येऊन नुकसान क्षती ग्रंस्ताना मदत मिळण्याच्या दृष्टिने प्रस्ताव पाठविण्यात आले. पुर्णतः क्षतीग्रस्त ३८ कुंटूबाना खावटी मंजुर करण्यात आली. त्याप्रमाणे एकुण २ लाख ५९ हजार २०० रूपयाचे धनादेश तहसीलदार संजय नागटिळक यांचे हस्ते वाटण्यात आले. पूर ओसरल्यानंतर ही घरं पूर्णतः धोकादायक झाली आहेत.
अतिवृष्टीमुळे बेघर झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन करून त्यांना घरे देण्याची घोषणा प्रशासनाने केली होती. मात्र याबाबत आवश्यक ती कार्यवाही न झाल्याने पळसगांव (पि) येथील ३८ कुटुंबांनी अतिवृष्टी धारकाची घरकुल व मदत मिळण्याकरिता आपल्या हक्कचे घर मिळण्याकरिता जिल्हा वारी केली होती, त्यामुळे तहसील प्रशासनाने याची दखल घेवून चिमूर मार्फत उपलब्ध असलेल्या निधीतून काही पूर्णता पडलेल्या घराना खावटी मदतीचा ३८ कुटुंबाना २५९२०० रु धनादेश वाटप करण्यात आला.
घरकुल व मदतीची आवश्यकता असताना तहसील कडून खावटी मदतीचा धनादेश देण्यात आला असा प्रश्न या निमित्याने समोर येत आहे, अतिवृष्टी चा नागरिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. पळसगाव येथील घरे वाहून गेली, तर काहींची पडझड झाली, त्यामुळे या भागातील रहिवाशांचे शाळांत स्थलांतर करण्यात आले होते. अजूनही शाळेतच निवासी आहेत पूरस्थिती ओसरल्यानंतर तरी घरकुल मिळतील या आशेने अजूनही मारोती शेंडे, नामदेव गावतुरे, विस्वनाथ सोनूले, गुलाब सोनूले, महानंदा गूळधे, श्रीकृष्ण चौधरी हे कुटुंब अजूनही शाळेतच निवासी आहेत, मात्र याकडे स्थानिक लोकप्रतिनिधीचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खवटी चा धनादेश मिळाल्यानंतर आम्हच्या घरकुल मिळणार का? व कधी मिळणार या बाबत अजूनही माहिती निश्चित माहिती मिळाली नाही, मात्र याचा वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्यात येत आहे.
🔹प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे देण्याची मागणी
गरीब कुटुंबांनी पूरग्रस्तांने केली आहे,
सदर घरकुलाची आर्थिक मदत लवकर मिळावी अशी वेथ्या पुरगस्तानी प्रस्तुत प्रतिनिधी जवळ वेक्त केली.
🔹पळसगांव येथील पुरगस्ताना ज्यांची घरे पूर्णता पडलेली असल्या ३८ कुटुंबाना खावटीचा धनादेश वाटप करण्यात आले असून वरील कुटुंबाना घरकुल मिळावे या करिता संवर्ग विकास अधिकारी चिमूर यांना कळविण्यात आले असून D R D विभागाला सदर यादी पाठविली असून पुढील कार्यवाही चालू आहे.
मा.संजय नागटिळक
तहसीलदार साहेब तहसील कार्यालय,चिमूर



















