चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)विकास खोब्रागडे
दि.५.१०.१९
पालसगाव- स्वामी विवेकानंद आश्रम शाळा पळसगाव येथील विद्यार्थी,शिक्षक,कर्मचारी व वनपरिक्षेत्र अधिकारी व वनपाल, वनरक्षक यांचे उपस्थितीत वन्यजीव सप्ताह व मतदार जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांनी रँली काढुन जनमाणसापर्यंत वन्यजीवांचे संरक्षण,व मतदार जनजागृती करण्यासाठी आपले मत देशाच्या प्रगती साठी किती महत्त्वाचे आहे हे नारे आरोळ्या देवून संदेश पोहचवला.विद्यार्थ्यांन वन्यजीवबाबत मार्गदर्शन केले. तसेच वन्यप्राणी हा महत्त्वाचा घटक याचे संरक्षण करणे गरजेचे आहे हेपटवून दिले.वन्यजीव व कायदा यावर प्रकाश टाकला. लहान चिमुकल्या विद्यार्थी कडून निंबद स्पर्धा घेण्यात आली,यात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक, शिवानी मद्यमीक विद्यालय चिमुकल्यां निबंध,वनाविषयी, प्राण्यांच्या सुरक्षा विषयी माहिती दिली. वन्यजीव सप्ताह प्रस्तावनेतून १९७२ वन्यजीव संरक्षण कायदा व पर्यावरण तसेच पशुसंवर्धन वनांचे महत्त्व उपस्थितां समोर व्यक्त केले.बाबा कोडापे यांनी पर्यावरण व परिसंस्था यातील अनेक घटक नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत सिंहाची,चिताची वाघांची संख्या जगात अल्प प्रमाणात आहे.उपभोगवादी वृत्ती पर्यावरण ऱ्हासाला कारणीभूत आहे.जल जमिन व जंगल यावर जे जीवनचक्र आहे त्या सर्व घटकांचा विचार होणे गरजेचे आहे.ओझोन हे पृथ्वीचे कवच आहे.परंतू CFC नष्ट करण्यास कारणीभूत आहे.साप हा शेतकऱ्यांचा कसा मित्र आहे हे आपल्या शब्दात मांडले.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा.ठेमस्कार वनपरिक्षेत्र अधिकारी,मा.सुरजगाडे वनपाल, गेडाम वनरक्षक,दांडेकर वनरक्षक,गेडाम गोंडामोहली वनरक्षक,मेश्राम बाबू,दिलीप भेंडारे,संदीप ढोक,रणजित शिवरकर,दुर्योधन खोब्रागडे, कु.गिरी मॅडम स.शिक्षिका, जयदेव रेवतकर सर,वनकामगार वर्ग व शिक्षक वर्ग इत्यादींचा सहभाग होता.



















