सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.७/३/१९
पाटण, सध्या अगोदरच्या काळा मध्ये फलटण तालुक्यातील गावांना पोलीस पाटीलच नव्हते पण गेल्या काही महिण्यांपुर्वी पोलीस पाटील भरती झाल्याने फलटण तालुक्या मध्ये गावामध्ये ही पोलीस पाटील आले.अवैध धंद्याची माहीती गाव पातळीवरील पोलीस पाटलांना माहीती असते पण हे पाटील मंडळी आपल्या वरीष्ठांना सांगत का नाहीत ? आणि सांगीतले असेल तर या मागे थोडे वेगळेच कारण तर नाही ना ? फलटण चे उपअधिक्षक डाॅ.अभिजीत पाटील,तसेच अगोदरचे तहसीलदार विजय पाटील आता विजय पाटील यांची बदली झाल्याने नविन तहसीलदार सुध्दा हनुंमत पाटीलच या पाटील मंडळीकडून तालुक्यामध्ये चाललेल्या अवैध धद्यांना आळा बसेल का? फलटण तालुक्यातील राजरोस पणे चाललेल्या वाळु,मुरूम,माती,हातभट्टी दारू,ताडी,जुगार,मटका हे धंदे बंद होतील का ? विजय पाटील यांना वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून तसेच लेखी तक्रार देऊन ही त्यांनी याबाबत कोणतीच कारवाई केला नाही व केलीही असेल तर सर्वसामान्य लोकांवर जुजबी कारवाई करून ती फक्त कागदपत्रावरच मर्यादित ठेवली आहे हे सर्व लोकांना दाखवण्यासाठी तर नव्हे ना? तालुक्यातील लोंकाना नवीन तहसीलदार यांच्याकडून अपेक्षा आहेत. नक्कीच नवीन तहसीलदार हनुमंत पाटील हे परिसरातील अवैध धंदे बंद करतील अशी आशा आहे.फक्त छोटे-छोटे गोरगरीब लोकांवर जुजबी कारवाई करून मोठे माफीया मोकाट सोडू नयेत अशीच नागरीकांची अपेक्षा आपल्याकडुन आहे.जनतेची अपेक्षा आपण आपल्या कार्यातुन पूर्ण कराल अशी अपेक्षा बुध्दिस्ट प्रेरणा ग्रुप तालुका अध्यक्ष गोविंद मोरे यांनी तहसीलदार यानां भेटल्या नतंर व्यक्त केली आहे. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



















