नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,महेश दारुंटे
दि.२२.०३.२०२०
येवला- शनिवार व रविवार म्हणजे येवला येथील पैठणी आणि कापड व्यावसायिकांसाठी महत्वाचा दिवस, मात्र कोरोनाच्या भीतीने शनिवार (दि.२१) पासूनच संपूर्ण बाजारपेठ बंद रस्त्यावरील शुकशुकाट आणि पैठणीच्या महरघरी मात्र “दुकानं बंद” अशी स्थिती शहरभर होती. फक्त किराणा दुकाने, भाजीपाला व औषध दुकानं सुरू होती. नागरिकांनी स्वतः पुढाकार घेतल्याने शहरात अघोषित संचारबंदी लागली होती.
नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी शनिवारपासूनच शहरातील किराणा दुकाने, भाजीपाला, औषधे दुकानं सोडून इतर सर्व दुकाने आस्थापना बंद करण्याचे आदेश मुख्यधिकारी संगीता नांदुरकर यांनी दिले आहेत. पुढील आदेशा पर्यंत सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज (दि. २२) देशभरात जनता कर्फ्यु असला तरी शनिवारीच त्याची रंगीत तालीम बघायला मिळाली. मेन रोड, बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल शनिपटागन ,इंद्रनील कॉर्नर, पालिका रोड, थिएटर रोड , काळामारुती रोड, फत्तेबुरुज नका, गंगादरवाजा नका, मनमाड रोड, विंचूर रोड, सराफ बाजार, बुरुड गल्ली, भाजी मार्केट, आदी ठिकाणी सर्वच व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली होती.
• आज सर्वत्र जनता कर्फ्यु पाळला जाणार असला तरी येवल्यात शनिवारीच नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन दुकाने बंद ठेवली आहे. शहरात फवारणी मोहीम देखील राबविण्यात आली आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर संपर्काची साखळी तोडायची असल्याने नागरिकांनी पुढील आदेश येईपर्यंत सर्व दुकाने बंद ठेवावीत – संगीता नांदुरकर,मुख्यधिकरी पालिका,येवला



















