महाबळेश्वर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी
दि.०८.०३.१९
श्रद्धा रोकडे व तिच्या साथीदारांनी दि.०५.०२.१९ रोजी जेष्ठ समाजसेविका छायाताई शिंदे यांचेवर हल्ला करून त्यांचे दागिने हिसकावून नेले या घटनेची माहिती स्वतः छायाताई शिंदे यांनी पोलीस स्टेशन महाबळेश्वर येथे जाऊन पीएसआय बालाजी गायकवाड यांना सांगितली. तरीदेखील पीएसआय गायकवाड यांनी श्रद्धा रोकडे हिचे नाव गुन्ह्यातून वगळले शिवाय दागिने हिसकावल्याची घटना तक्रारीमध्ये नोंदवून घेतली नाही व विनयभंगाची जुजबी तक्रार जाणीवपूर्वक नोंद केली त्यामध्ये इतर घडलेल्या बाबी समाविष्ट केल्या नाहीत. त्यामुळे बालाजी गायकवाड यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार छायाताई शिंदे यांनी महाबळेश्वर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली आहे. बालाजी गायकवाड यांचे श्रद्धा रोकडे हिला अभय असल्यामुळेच तिच्यावर कारवाई होत नाही असेही तक्रारीमध्ये म्हटले आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की छायाताई यांचेवर दि.०५.०२.१९ रोजी श्रद्धा रोकडे व तिच्या साथीदारांनी हल्ला केला व त्यांचे गळ्यातील सोन्याचे मौल्यवान दागिने हिसकावून नेले. या हल्ल्याने छायाताई यांना दुखापत झाली होती तसेच त्यांचा ब्लड प्रेशर देखील वाढला होता त्यांना मानसिक धक्का देखील बसला होता त्यामुळे त्यांना दवाखान्यात पाठविण्यात आले होते. घडली हकीकत सांगितल्यावर पीएसआय गायकवाड यांनी मी आपण सांगीतल्याप्रमाणेच आपली तक्रार नोंदवून घेतली आहे असा विश्वास दाखविला होता. ही घटना घडली तेव्हा छायाताई यांच्या कुटुंबातील एकही व्यक्ती त्यांच्यासोबत नव्हता. डॉक्टरांनी छायाताई यांना आराम करण्याचा सल्ला दिला. जेव्हा गळ्यातील दागिने हिसकावल्याचा उल्लेख व श्रद्धा रोकडे हिचे नाव तक्रारीमध्ये नसल्याचे छायाताईना समजले तेव्हा छायाताई यांनी ०९.०२.१९ रोजी पोलीस निरीक्षक महाबळेश्वर यांचे नावे अर्ज देऊन एपीआय निंबाळकर यांना भेटून हा प्रकार सांगितला होता परंतु त्यावर अद्याप कसलीही कारवाई झाली नाही.पीएसआय गायकवाड हे जाणीवपूर्वक श्रद्धा रोकडे हिचे नाव गुन्ह्यातून वगळत आहेत व आरोपीला सहकार्य करत आहेत.आरोपीला सहकार्य करणे तसेच कर्तव्यात कसूर करणे या कारणांसाठी पीएसआय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अर्जात करण्यात आली आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळविण्यासाठी निर्भिड पत्रकारचे मुख्य संपादक नंदकुमार जोगदंड यांनी पीएसआय गायकवाड यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची व उद्धट उत्तरे दिली.श्रध्दा रोकडे हिच्यावर त्वरित कारवाई व्हावी म्हणून राज्यभरातून निवेदने दाखल होत असून या प्रकरणी चौकशी न करणे व कसलीही कारवाई न करणे पत्रकारांना उद्धट उत्तरे देणे यामुळे पोलिसांची प्रतिमा देखील मलिन होत आहे.



















