निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी, महेश दारुंटे
दि.१७.०३.२०२०
येवला- कोरोनाच्या विषाणूंमुळे पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका बसला असून,कोंबड्यांना मागणीच नसल्याने व्यावसायिकांवर मंदीचे सावट कोसळले आहे. पोल्ट्री व्यावसायाला करोणाच्या साथीमुळे नजर लागल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले त्यामुळे नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी व्यावसायियांनी केली आहे.तालुक्यातील पोल्ट्री उद्योग व्यावसायिकांना प्रहार संघटनेच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारुळे यांना निवेदन देऊन शासनाकडे आर्थिक अनुदानाची मागणी केली.
दोन वर्षापासून पोल्ट्री व्यवसायावर सुलतानी संकटे आली असल्याने अगोदरच व्यावसायिक अडचणीत आहेत. आता करोना साथीमुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. पोल्ट्री व्यावसायिकांना कोंबड्यांना भाव मिळत नसल्याने फेकून देण्याची वेळ आली आहे. उत्पादन खर्चही निखेनासा झाल्याने पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होऊन आत्महत्येची वेळ आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
येत्या आठ दिवसात आर्थिक मदतीसंदर्भात शासनाने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करून शासकीय कार्यालयात कोंबड्या सोडण्याचा इशारा दिला आहे शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन पोल्ट्री व्यावसायिकांना न्याय देवा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकध्यक्ष हरिभाऊ महाजन, किरण चरमळ,अशोक काळे, नानासाहेब भड, नानासाहेब पिंगळे, श्रावण वाघ, अरुण देवरे, निखिल सोनवणे, अभय खैरनार, बाजीराव सोमवंशी, विजय मगर, समाधान खोखले, कृष्णा जमधडे, राजेंद्र सानप, पांडुरंग आव्हआड आदी पोल्ट्री व्यावसायिकांच्या सह्या आहेत.



















