सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.९.०१०.१९
खटाव- तालुक्यातील वडूज शहरामधे काही दुकानात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकची खुलेआम विक्री होताना दिसत आहे. प्लॅस्टिकचे ग्लास,कप,कॅरी बॅग,पत्रावळी विक्रीवर व वापरावर महाराष्ट्रात बंदी होती. परंतु २ ऑक्टोबर पासून संपूर्ण भारतात प्लॅस्टिक बंदी लागू झाली तरी देखील मोठ्या प्रमाणात प्लास्टिक विक्री व वापर सुरू आहे.काही पर्यावरण प्रेमींनी नवरात्रीच्या उत्सवात प्लॅस्टिक वापराच्या विरोधात जन जागृतीची मोहीम राबवली. प्लॅस्टिक विक्रीच झाली नाही तर वापर कुठून होईल ? असं मत पर्यावरण प्रेमींनी केल. प्लॅस्टिक विक्रेतेना पाठबळ कोण देत, असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे वडूज नगरपंचायतीचे कर्मचारी,अधिकारी व सातारा प्रदूषण विभाग हे कारवाई का करत नाही अथवा काही आर्थिक देवाण घेवाण तर झाली नाही? असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.खटाव- तालुक्यातील वडूज शहरामधे काही दुकानात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकची खुलेआम विक्री होताना दिसत आहे. प्लॅस्टिकचे ग्लास,कप,कॅरी बॅग,पत्रावळी विक्रीवर व वापरावर महाराष्ट्रात बंदी होती. परंतु २ ऑक्टोबर पासून संपूर्ण भारतात प्लॅस्टिक बंदी लागू झाली तरी देखील मोठ्या प्रमाणात प्लास्टिक विक्री व वापर सुरू आहे.काही पर्यावरण प्रेमींनी नवरात्रीच्या उत्सवात प्लॅस्टिक वापराच्या विरोधात जन जागृतीची मोहीम राबवली. प्लॅस्टिक विक्रीच झाली नाही तर वापर कुठून होईल ? असं मत पर्यावरण प्रेमींनी केल.
प्लॅस्टिक विक्रेतेना पाठबळ कोण देत, असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे वडूज नगरपंचायतीचे कर्मचारी,अधिकारी व सातारा प्रदूषण विभाग हे कारवाई का करत नाही अथवा काही आर्थिक देवाण घेवाण तर होत नाही? असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.



















