सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, सुभाष जाधव
दि.७.१२.१९
बंद रेल्वे फाटक ओलांडून जाणाऱ्या पादचारी व दुचाकीस्वार यांच्या वर कडक कारवाई करण्यात यावी.अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे लोणंद ग्रामस्थांनी केली आहे.
गेल्या दोन महिन्यांत लोणंद येथे बंद रेल्वेचे फाटक ओलांडत असतानाच अनेक अपघात घडले असून या अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत.
रेल्वे रुळ ओलांडणे हा फौजदारी गुन्हा आहे. मात्र रेल्वे अधिकारी यावर कारवाई करीत नाहीत. यामुळे पादचारी व दुचाकी स्वार फाटक बंद झाल्यावर सुध्दा रुळ ओलांडून जातात. मात्र लोणंद रेल्वे पोलीस व अधिकारी यांनी याबाबत कडक कारवाई करण्याची गरज आहे. यापुढे बंद फाटक ओलांडून जाणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.



















