सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, शिवाजी भोसले
दि.१४.०३.२०२०
वाई- कोरोना चा जगभर थैमान सुरू आहे आणि कोरोना बाधित रुग्ण संपर्क टाळण्यासाठी कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सातारा जिल्हा अधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील यात्रा रद्द करण्याचे आदेश दिले होत, या आदेशाचे उल्लंघन वाई तालुक्यातील बावधन यात्रा कमिटीने केले आहे त्यामुळे बावधन यात्रा कमिटीवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत अशी माहिती सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुढे अधीक्षक सातपुते म्हणाल्या, कोरोना विषाणूमुळे संसर्ग होऊ नये यासाठी सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे आणि या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सर्व उत्सव व यात्रा रद्द केल्याचे आदेश सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बुधवारी दिले होते आणि त्यानंतर बावधन यात्रा कमिटीशी तशी चर्चा करण्यात आली होती त्यानंतर सुद्धा दि.१३ मार्च रोजी बावधन येथे यात्रा कमिटी मार्फत यात्रा करण्यात आली त्यामुळे बावधन यात्रा कमिटीवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील यामुळे नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रश्नच नाही. गर्दी झाल्यामुळे कोरोनाचा प्रसार व संसर्ग जास्त प्रमाणात होऊ शकतो आणि तो होऊ नये यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न सुरू आहे गावातील चार-पाच लोकांना घेऊन विधिवत पूजा करण्यास हरकत नाही परंतु गर्दी जमा झाल्यामुळे कोरोनाचा संसर्ग व धोका जास्त होण्याची वस्तुस्थिती नाकारता येत नाही या सर्व बाबींमुळे प्रशासन कठोर भूमिका घेत कारवाई करत आहे.



















