सोलापुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२४.१२.१९
करमाळा- केंद्र सरकारने नागरिकत्व विधेययात बदल करून नवीन तयार केलेल नागरिकत्व सुधारणा विधेयक रद्द करावे अशी मागणी सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसन केली आहे. याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,या विधेयकामुळे भटक्या जमाती व अल्पसंख्याक समाजाला नव्याने नागरिकत्व नोंदणी किंवा नागरीकत्व सिद्ध करण्यासाठी पुरावे द्यावे लागणार आहे. हे असे पुरावे सिद्ध करणे त्यांना खूपच अडचणीचे ठरणार आहे. केंद्र सरकार सदर विधेयकाच्या आडून अल्पसंख्याक व भटक्या जाती जमाती यांना वेठीस धरले जात असून या माध्यमातून केंद्र सरकार संविधानाला आव्हान देन्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सदर विधेयक रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदन देते वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड.अजिनाथ शिंदे, राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीन झिंजाडे, सामाजिक न्याय विभागाचे तालुका आध्यक्ष शिवाजी जाधव, सोलापूर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष महेश काळे पाटील, राष्ट्रवादी प्रदेशचे नितीन खटके, करमाळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय अडसूळ, सरपंच भोजराज सुरवसे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कांबळे, संभाजी ब्रिगेडचे माजी अध्यक्ष संदीप रोडगे व राज झिंजाडे, राष्ट्रवादीचे युवा नेते सचिनराजे नलावडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.



















