चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
दि.११.१०.१९
नागभीड- सध्या सत्तेत असलेले भाजप आणि विरोधी पक्षात असलेले काँग्रेस हे दोघेही आपापल्या भूमिका प्रामाणिकपणे निभावताना दिसत नाही.”तेरी भी चुप ,मेरी भी चूप” अशा भूमिकेतून ते वागत आहेत. त्यामुळे भाकर दोन्ही बाजूने करपली असुन आता भाकर बदलण्याची वेळ आली आहे.अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड प्रकाश आंबेडकर यांनी केली. नागभिड येथिल नवखळा येथे वंचीत बहुजन आघाडीचे चिमूर विधानसभेतील तरुण तडफदार उमेदवार अरविंद सांदेकर आणि ब्रम्हपूरी विधानसभेतील उमेदवार चंद्रलालजी मेश्राम यांच्या संयुक्त प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी अँड प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारच्या शैक्षणिक धोरणावर कडाडून टीका करताना डीबीटी प्रणालीमुळे आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहात असल्याचे सांगितले. शिक्षण महागल्यामुळे तंत्रशिक्षणाच्या ६५ हजार जागा रिक्त आहेत. त्यातील ४० हजार जागा ओबीसींच्या आहेत. आईबापाची ऐपत नाही म्हणून हे विद्यार्थी महागडे शिक्षण घेऊ शकत नसल्याचे ते म्हणाले. यावेळी मंचावर चिमूर विधानसभेतील उमेदवार अरविंद सांदेकर, ब्रम्हपूरी विधानसभेतील उमेदवार चंद्रलालजी मेश्राम, वंचीत बहुजन आघाडीचे नेते अँड.धनराज वंजारी, कुशल भाऊ मेश्राम, डॉ.रमेश कुमार गजभेय, जयदिप खोब्रागडे, स्नेहदिप खोब्रागडे, अश्र्विन मेश्राम, राजू घोनमोडे उपस्थित होते. या प्रचारसभेचे संचालन प्रकाश मेश्राम यांनी केले तर प्रास्ताविक ज्ञानेश्वर नागदेवते यांनी केले आभार प्रदर्शन स्नेहदिप खोब्रागडे यांनी मानले.नागभीड- सध्या सत्तेत असलेले भाजप आणि विरोधी पक्षात असलेले काँग्रेस हे दोघेही आपापल्या भूमिका प्रामाणिकपणे निभावताना दिसत नाही.”तेरी भी चुप ,मेरी भी चूप” अशा भूमिकेतून ते वागत आहेत. त्यामुळे भाकर दोन्ही बाजूने करपली असुन आता भाकर बदलण्याची वेळ आली आहे.अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड प्रकाश आंबेडकर यांनी केली.
नागभिड येथिल नवखळा येथे वंचीत बहुजन आघाडीचे चिमूर विधानसभेतील तरुण तडफदार उमेदवार अरविंद सांदेकर आणि ब्रम्हपूरी विधानसभेतील उमेदवार चंद्रलालजी मेश्राम यांच्या संयुक्त प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी अँड प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारच्या शैक्षणिक धोरणावर कडाडून टीका करताना डीबीटी प्रणालीमुळे आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहात असल्याचे सांगितले. शिक्षण महागल्यामुळे तंत्रशिक्षणाच्या ६५ हजार जागा रिक्त आहेत. त्यातील ४० हजार जागा ओबीसींच्या आहेत. आईबापाची ऐपत नाही म्हणून हे विद्यार्थी महागडे शिक्षण घेऊ शकत नसल्याचे ते म्हणाले. यावेळी मंचावर चिमूर विधानसभेतील उमेदवार अरविंद सांदेकर, ब्रम्हपूरी विधानसभेतील उमेदवार चंद्रलालजी मेश्राम, वंचीत बहुजन आघाडीचे नेते अँड.धनराज वंजारी, कुशल भाऊ मेश्राम, डॉ.रमेश कुमार गजभेय, जयदिप खोब्रागडे, स्नेहदिप खोब्रागडे, अश्र्विन मेश्राम, राजू घोनमोडे उपस्थित होते. या प्रचारसभेचे संचालन प्रकाश मेश्राम यांनी केले तर प्रास्ताविक ज्ञानेश्वर नागदेवते यांनी केले आभार प्रदर्शन स्नेहदिप खोब्रागडे यांनी मानले.



















