मदत नव्हे कर्तव्य..!
‘गोरगरिबांना भरवू घास, पूर्ण करु मदतीचा ध्यास..
सोलापूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१२.०५.२०२०
★ गरजुंना जेवण देण्याचा आजचा ४० वा दिवस
कळंब- जिल्ह्याचे नेते आमदार श्री राणाजगजितसिंहजी पाटील व आमदार सुजितसिंहजी ठाकुर यांच्या संकल्पनेतुन,भाजप नेते अजित दादा पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या अन्नछत्र आज ४० व्या दिवशी उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ मॅडम व नायब तहसीलदार असलम जमादार यांना भेट देऊन सुरू असलेल्या उपक्रमाच कौतुक केलं आपण पण या काळात गरजूंसाठी एक वेळचा अन्न त्यांना घरपोच दिलं याबद्दल आयोजकांचे अभिनंदन देखील केले.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष भैय्या बावीकर, प्रशांत लोमटे, इम्रान मुल्ला, राहुल चोंदे, वसीम शेख, अभय गायकवाड, शुभम जोशी, बाळासाहेब शिंदे, पिंटू चंदनशिवे, धम्मा वाघमारे, सम्राट गायकवाड, नाना पुरी, सोनू गोरे,उपस्थित होते.
यावेळी कळंब शहरातील नागरीकांनी ज्यांना शक्य आहे त्यांनी या उपक्रमास सहकार्य करावे, तुमचे योगदान आपल्याच गावातील प्रत्येक गरजुची भूख भागवेल, तसेच आपल्या सुरक्षेसाठी अहोरात्र रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य बजावत असलेले पोलीस,जिवाची बाजी लावत आसलेले वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, यांना ही तुमच्या मदतीने भोजनाचे सहकार्य होईल. असे आवाहन करण्यात आले.



















