सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२३.०३.२०२०
महाबळेश्वर- प्रधानमंत्री मोदी यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आदेशाप्रमाणे काल दि.२२.०३.२०२० रोजी सकाळ पासून जनतेने मोठ्या स्वयंशिस्तीने जनता कर्फ्यु यशस्वी केला.पण प्रधानमंत्री मोदी यांनी सायंकाळी कोरोनाच्या लढाईत आपल्यासाठी काम करणाऱ्या सर्व स्टाफला मानवंदना देण्यासाठी आपल्या बाल्कनी मध्ये जमा व्हा आणि टाळ्या,थाळ्या, घंटा वाजवा असे आवाहन देखील केले होते.त्यास अनुसरून अज्ञानातून जनता मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येऊन टाळ्या,थाळ्या, घंटा वाजवू लागली.
विशेष म्हणजे मुख्य बाजारपेठेतून नगरपालिकेचा फायर फायटर,अँबुलन्स देखील फिरवली गेली आणि या वाहनांनी आपले सायरन कसलीही आवश्यकता नसताना वाजवून जनतेचे आकर्षण खेचून घेतले.व एखाद्या हिरोप्रमाणे अभिवादन स्वीकारत शहरभर फिरले.त्यांचे सायरन एकूण जनता जवळ येऊन त्यांना अभिवादन करत होती.
खरंतर गरज नसताना फायर फायटर व रुग्णवाहिका शहरातून का व कोणाच्या आदेशाने फिरवली गेली.त्याच्या पाठीमागील उद्देश काय होता याची चौकशी जिल्हाधिकारी यांचे मार्फत व्हावी व संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.



















