सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२०.०३.२०२२
महाबळेश्वर- बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपच्या वतीने क्रांतिदिनानिमत्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्षा छायाताई शिंदे,बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण गोरखनाथ शिंदे, महाबळेश्वर हॉकर्स युनियनचे उपाध्यक्ष अनिल साळुंखे,सुमित कांबळे, अमोल काकडे, सागर कांबळे, संगीता कांबळे, श्वेता मोरे, सुनंदा रोकडे,संपत मोरे, हैदर मानकर, गोरखनाथ शिंदे, शांताराम मोरे,रंजना कांबळे,नंदा संपत मोरे,राजू मुलानी, पांडुरंग काकडे यांचेसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या प्रसंगी किरण शिंदे यांनी बोलताना दि.२०.०३.१९२७ रोजी पिण्याच्या पाण्याचा अधिकार प्राप्त व्हावा यासाठी जगातील इतिहासात नोंद असलेला ऐकमेव सत्याग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता.त्यामुळे आजचा क्रांतिदिन साजरा होतो असे सांगुन आजही जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज असल्याचे अधोरेखित केले.
यावेळी सामुदायिक त्रिसरण व पंचशील ग्रहण करण्यात आले. शेवटी धम्मपालन गाथा पठण करून कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.



















