चंद्रपूर (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, विकास खोब्रागडे
🌑 रस्ता दुरवस्थेने शेतकरी त्रस्त
🌑 शेतमाल नेताना शेतकऱ्यांना अडचण
दि.२१/११/१८
चंद्रपूर (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, विकास खोब्रागडे चंद्रपूर, जिल्हामधील चिमूर तालुक्यातील मासळ बु, परिसरातील शेत शिवाराकडे जाणाऱ्या ३७ पांदन रस्त्याची कामे रखडली असून परिसरातील शेतकऱ्यांना सदर रस्त्याच्या कामाची आस लागली असताना प्रशासकीय स्तरावरून काम रखडले असून याबाबत शेतकऱ्यांमध्ये कमालीचा रोष आहे. मासळ बु, परिसरातील पूर्णता धान व कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या अधिवास आहे. शेतमालाची आवकजावक करण्यासाठी विविध ठिकाणी पांदन रस्त्यांना कामे झाल्याचे तर काही ठिकाणी काम मात्र झाले नाही. प्रत्यक्षात वस्तुस्थिती जवळपास ३७ पांदन रस्त्याची कामे झाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये या बाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. मासळ बु, वरून नंदारा,तुकूम,मानेमोहाली,करबडा,कोलारा,सातारा, कोसंबी रिठ,तळोधी गावगन्ना,आदी भागातील अंतर्गत पांदन रस्त्याची कामे रखडली असून काही ठिकाणी अर्धवट बांधकाम केल्याचे आढळून येत आहे. सध्या शेतकऱ्याचे कामाचे दिवस आहेत.अनेकाना कापूस वेचणे व धान पिक मळणीनीचे कामे सुरु आहे.मात्र रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल बैलगाडीने वाहतूकचा त्रास सहन करावा लागत आहे.मागील पावसाळ्यात पाऊसामुळे मोठ-मोठे खड्डे पडले आहे.रखडलेल्या रस्त्यांची खडीकरण न झाल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वरिष्ठांणी याकडे लक्ष देऊन रखडलेल्या पांदन रस्त्याचे खडीकरनाचे कामे करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे.



















