अहमदनगर जिल्ह्यातील हारेगाव येथील पीडीताची घेतली दिपकभाऊंनी भेट…
मुंबई(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, मिलिंद राऊत
दि.३१.०८.२०२३
मुंबई- भाजप सरकारच्या कालावधीत मागील काही वर्षापासून दलित व स्त्रियांवरील अन्याय-अत्याचार मोठ्या प्रमाणत वाढले आहे. जातीयवादी बांडगुलांचे प्रस्थ वाढत चालले आहे. भाजपचे डबल इंजिन सरकार यासाठी सपशेल अपयशी ठरले आहे. ही मोठी शोंकातीका आहे. यातच काही दिवसापूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील हारेगाव येथे पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. मागासवर्गीय चार मुलांना गावातील जातीयवादी गावगुंडांनी केवळ संशयावरून हातपाय बांधून अर्धनग्न वरती लटकावून अंगावरती लघुशंका व थुंकून बेदम मारहाण करण्यात आले. या घटनेचे संपूर्ण देशभरात तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे व समवेत शेकडो कार्यकर्त्यांसह काल दि. ३० ऑगस्ट रोजी मारहाण झालेल्या पीडितांची भेट घेतली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना दिपकभाऊ निकाळजे म्हणाले की, पीडित मुलांपैकी काही मुले मातंग समाजातील व काही मुले बौद्ध समाजातील आहेत मात्र एकाच पिडीताच्या नावानं FIR दाखल करण्यात आली आहे. हे स्पष्ट चुकीचे आहे. प्रत्येक पिडिताच्या फिर्यादीनुसार वेवेगळ्या तक्रार दाखल करणे गरजेचे आहे. सदर अन्याय झालेल्या मुलांच्या नावाने कुणाल मगर, शुभम मागाडे, ओम गायकवाड, प्रणय खंडागळे या चार मुलांच्या फिर्यादीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला पाहिजे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला हक्क आणि अधिकार दिले आहेत आणि कायदा आमच्या बापाचा आहे, कायदा आमच्या बापाने लिहून ठेवला आहे. आम्ही शांत आहोत मात्र आमच्या शांततेचा कोणी अंत पाहू नये. इथून पुढे महाराष्ट्रामध्ये कुठेही दलितांवर अन्याय अत्याचार झाल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असे दिपकभाऊ निकाळजे यांनी कठोर शब्दात ठणकावून सांगितले. सदर पिडीत मागासवर्गीय ४ मुलांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत रुजू करण्यात यावे अशी मागणी केली. काळही आणि यापुढेही दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, महिला, शोषित-पीडित यांच्या पाठीशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) हा पक्ष ठामपणे उभा आहे असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, महाराष्ट्र संघटक कैलास भाऊ जोगदंड, उत्तर अध्यक्ष शशिकांत दारुडे, नगर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, उत्तर अहमदनगर जिल्हा अध्यक्ष राकेश कापसे, जिल्हा सचिव किरण बगाडे, उपाध्यक्ष सुनील ओव्हाळ, राजू ओव्हाळ व नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्रदादा गायकवाड, प्रभारी प्रकाश पवार, सुदत्त खरात, प्रतीक यादव, जगजीत सिंग सासन, गौतम कांबळे, दिलीप कदम व शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.



















