नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१४.०५.२०२०
येवला- येथील रुग्णाची संख्या अनपेक्षित पणे वाढत आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेऊन यापुढे रुग्ण वाढणार नाही. यासाठी उपाययोजना करा. अशा सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथील अधिकाऱ्यानं दिल्या. येवल्यात आरोग्य विभागाचेच सर्वाधिक रुग्ण असल्याचे एकूण आरोयमंत्री आवक झाले. जिल्ह्यात मालेगाव नंतर सर्वाधिक ३१ रुग्ण येवल्यात आढळल्याने मालेगांव कडे जाताना टोपे यांनी येथे थांबून माहिती घेतली. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयात भोजन करून अधिकाऱ्यांसोबत आढाव बैठक घेतली. क्वरांटाइन केलेल्या रुग्णांना नव्या नियमानुसार दहा दिवसांत घरी पाठवून द्या. मात्र ते सर्व जण घरातच राहतील याकडे लक्ष द्या त्यासाठी विशेष दक्षता घेतली तर अजून फायदा होणार नाही. अशा सूचना त्यांनी दिल्या. वाढत्या रुग्णसंखेसह आरोग्य विभाग बाधित होण्याचे कारण त्यांनी विचारले असता पहिल्या रुग्णाचा कर्मचाऱ्यांशी संपर्क आल्याने संख्या वाढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आयुर्वेदानुसार औषध देण्यास परवानगी असून या संदर्भात युट्यूबवर सविस्तर माहिती आहे. अशीच माहिती देताना जे रुग्ण क्वरांटाइन तसेच बाधित झाल्याने उपचार घेत आहेत. त्यांना करमणुकीची साधने उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बैठकीला प्रंतधिकरी ज्योती कावरे, पोलिस उपअधीक्षक समिरसिंग साळवे, भुजबळ संपर्क कार्यालयाचे प्रमुख बाळासाहेब लोखंडे, तहसीलदार रोहिदास वारुळे, मुख्याधिकारी संगीता नांदुरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शैलजा कृपास्वामी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हितेंद्र गायकवाड,पोलिस निरीक्षक संदीप कोळी, अनिल भवरी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक लोणारी, सचिन कळमकर, भाऊसाहेब धनवटे आदी उपस्थित होते.



















