रत्नागिरी(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१८.१२.२०२०
रत्नागिरी- शहरातील राजिवडा भागात चोरट्यांचा वावर वाढल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दोन वर्षापूर्वी चोरट्यांनी येथे धुमाकूळ घातला होता. रात्रीच्यावेळी घराच्या छपरावरून उड्या मारून घरात शिरणाऱ्या चोरट्याचा तरुणांनी पाठलाग केला होता. आठवड्यापूर्वी राजिवडा भागात चोरट्यांची टोळी अनेकांना निदर्शनास आली होती. त्यांना पकडण्याच्या अगोदरच चोरट्यांनी पलायन केले. सतर्क नागरिकांमुळे चोरी करण्याचा त्यांचा चोरीचा डाव उधळला गेला. या प्रकारांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. पोलिसांनी राजिवडा भागात गस्त वाढवावी, अशी मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.



















