चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, विकास खोब्रागडे
दि.३१.०३.२०२०
चंद्रपूर- पळसगांव (पि) कोरोना संकटामुळे लॉकडाऊन झालेल्या जनतेला राज्यातील सरकारने दिलासा देण्याच प्रयत्न केला आहे. सरकारने तीन महिन्यांचे अन्नधान्य रेशन दुकानावर उपलब्ध करुन देण्याची सोय केली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली असून या संचारबंदीच्या काळात गरीब नागरिकांची उपासमार होऊ नये, यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. गरीब आणि गरजू लोकांना लॉकडाऊनमध्ये अन्न धान्याचा तुटवडा भासू नये म्हणून रेशन दुकानावर तीन महिन्यांचे रेशन आजपासून सोशल डिस्टन चा तंतोतंत पालन करून आज धान्य वाटप करण्यात आले. रेशनकार्ड नसले तरी लॉकडाऊनमध्ये अन्न धान्याशिवाय उपासमारीची वेळ कुनावरही येऊ नये त्या वेक्ती ला सुद्धा धान्य देण्यात येणार आहे, सध्याच्या परिस्थितीत एकही गरीब उपाशी राहू नये यासाठी धान्य दुकाना मध्ये त्यांचा साठी धान्य उपलब्ध असल्याची माहिती सुद्धा संजय पाटील पळसगाव धान्य दुकानदार यांनी दिली.



















