सोलापूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.२५.०३.२०२०
करमाळा- लॉकडाऊन स्थितीत गोरगरिबांचा भूकबळी जाऊ नये केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन झिंजाडे यांनी एका निवेदनाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील रोजगार हमी योजनेत काम करणारे मजूर व भूमिहीन कुटुंबे यांना संभाव्य भूकबळी च्या संकटातून वाचवणे गरजेचे आहे .याबाबत सदर निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,आजच (दि२५)देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी कोरोना रोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉक डाऊन केला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यानी यापूर्वीच राज्यात लॉक डाऊन केले आहे. म्हणजे एक प्रकारचे कर्फ्यू आहे. लोकांना जवळपास कशालाही घराच्या बाहेर पडायला परवानगी नाही. लोकांचे रोजगार गेले आहेत. सदरची लॉक डाऊन २१ दिवसांचे असले तरी प्रत्यक्षात कित्येक महिने आपन या संकटातून बाहेर पडणार नाहीत. आज देशभरात लाखो कुटुंब आपापल्या घरात लॉक झाली आहेत रोजगार हमीवर काम करणारी कुटुंब, भूमिहीन कुटुंब, रोजंदारीवर काम करणारी कुटुंब यांचे खूपच हाल होत आहेत त्यांना कोरोनामुळे बळी पाडण्याची एकीकडे भीती तर दुसरीकडे घरात बसल्याने रोजगार नसल्याने भूकबळी जाण्याची दाट शक्यता आहे. या परिस्थितीचा विचार करता रोजगार हमीचे सर्व मजूर, भूमिहीन कुटुंब, याना महात्मा गांधी रोजगार हमीच्या किमान वेतन नियमाप्रमाणे भत्ता व धान्य शीघ्र गतीने मिळणे गरजेचे आहे त्याची व्यवस्था आपण अतिशीघ्र गतीने केंद्र सरकारने करावी आशी मागणी सदर निवेदनात केली आहे. असं केलं तरच आपण संभाव्य भूकबळी वाचवु शकतो.असे सदर निवेदनात शेवटी म्हटले आहे.



















