चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२१.०२.२०२०
नागभीड- वंचित बहुजन आघाडीचे वतीने NRC, PNR या विषयावर केंद्र सरकारच्या काळात त्यांनी देशातील तमाम जनता जनगणना करतांना, गैर कांग्रेसी सरकारने रद्द करण्याची गरज आहे . याकरिता महाराष्ट्र सरकारने NCC,NPR कायदा केंद्र सरकारच्या काळात त्यांनी सुरू करून जनतेला वेठीस धरून जीवन आनंदाने जगण्यापेक्षा जनावरे मुक्त जगतात मात्र भारत सरकारच्या काळात जनगणना करतांना लोकांना NRC, ची भीती वाटत आहे. याकरिता महाराष्ट्र सरकारने, महा विकास आघाडी सरकारने या कायद्या विरोधात ठराव मंजूर करून केंद्र सरकारने NCC, NPR या विषयावर कोणत्याही परस्थितीमध्ये लागू करण्यात येऊ नये यासाठी संपूर्ण महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीचे वतीने राज्यातील सर्व तालुका स्तरावर निवेदन देऊन या कायद्याचे रद्द करण्याची मागणी करण्यात यावी अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीचे वतीने करण्यात आली आहे. नागभिड येथील काँग्रेसचे नेते दिनेश गावंडे यांनी निवेदन सादर केले आणि हे निवेदन महाराष्ट्र राज्य सरकारला सादर केले जाईल असे आश्वासन दिले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते राजकुमार मेश्राम, होमदेव मेश्राम, मनोहर खोब्रागडे, मनोहर ओरके, आशिष मेश्राम यांची उपस्थिती होती.



















