चंद्रपूर- (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.१४.०२.२०२०
चंद्रपूर- मूल तालुक्यातील मोरवाही-बेलघाटा रोडला लागून असलेल्या शेतात काम करीत असतांना अचानक वाघाने केलेल्या हल्ल्यात सरिता श्रीकृष्ण पाल वय ३४ वर्षे ही महिला जागीच ठार झाली ती आपल्या शेतात एकटीच काम करीत होती. वाघाने सरीतावर हल्ला केला त्यावेळी शेजारचा शेतात इतर महीला काम करीत होत्या. परंतु केवळ महीलाच असल्याने त्यासगळ्या घाबरून गेल्या. वाघाने अचानकपणे हल्ला केल्याने बचावासाठी सरिताला संधीच मिळाली नाही. तिने आरडाओरडा केला. मोरवाही-बेलघाटा रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याचा कामावर असलेल्या मजुरांना सरीताचा ओरडण्याच्या आवाज आला. ते सगळे आवाजाच्या दिशेने धावत गेले. मात्र तो पर्यंत वाघाने सरीताचे प्राण घेतले. लोक धावून आल्याने वाघ तिथून पळून गेला असे मोरवाही गावातील लोकांना सांगितले. गावाला जंगल लागुन असल्याने वाघासह इतरही वन्यप्राणी या भागात नेहमीच वावरत असतात व या मार्गाने रात्री उशिरापर्यंत रहिवासी ये-जा करीत असतात. मृतक महिलेचा पती ट्रॅक्टरवर मजूर म्हणून हमालीचे काम करतो व आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतो तर सरीता शेतीचे काम बघायची.



















