सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.६/३/१९
फलटण, श्रीराम साखर कारखान्यासमोर हायवा ट्रकने दुचाकी स्वारास पाठीमागून जोरावर धडक देऊन चिरडल्याने दुचाकी स्वार माजी सैनिकाचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती अशी की, महाड-पंढरपूर पालखी मार्गावर फलटण येथील श्रीराम साखर कारखान्यासमोर टि.व्ही एस. एक्सल गाडी क्रं. एम एच ११ ए टी ५८९६ या दुचाकी वरुन मार्केट कमिटीतून बाजरी घेऊन विडणी (दहाबिघे) येथे घराकडे चाललेल्या दुचाकीस्वारस पाठीमागून डांबरीकरणाची खडी घेऊन आलेल्या हायवा ट्रक क्रं. एम एच ११ए एल ८२०० या गाडीने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार माजी सैनिक विनायक आकोबा शिंदे वय ७५ रा. विडणी (दहाबिघे) यांच्या डोक्यावरून हायवा ट्रकचे चाक गेल्याने डोक्याच्या चेंदामेंदा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.हायवा ट्रक चालक गाडी सोडून घटनास्थळावरून फरार झाला असून या घटनेची फिर्याद फलटण शहर पोलिस ठाण्यात प्रेमजीत अभंग यांनी दिली असून घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा करण्यात आला याबाबत अधिक तपास पोलिस अधिकारी करीत आहेत. दरम्यान विनायक शिंदे यांनी भारतीय लष्करात वीस वर्ष देशसेवा करुन सेवानिवृत झाल्यानंतर ते विडणी येथे शेती व्यवसाय करत होते. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच अनेकांना धक्का बसला. विनायक शिदे यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी,सूना नातवंडे असा परीवार आहे.



















